सचिन वाझेच्या अडचणी वाढल्या ; मीठी नदीत सापडला पुराव्यांचा ‘खजिना’

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- मनसुख हिरेन हत्याप्रकरणात आता एनआयएच्या हाती नवीन पुरावे लागल्याने एकच खळबळ माजली आहे. मनसुख हत्या प्रकरणामध्ये आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझेला राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली. त्यानंतर या प्रकरणात सचिन वाझेचा थेट संबंध असल्याचे बरेचसे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागले. मनसुख … Read more

सोने – चांदी पैशांपाठोपाठ आता जनावरांची होऊ लागली चोरी

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- जिल्ह्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यात काही दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये पैसे, सोने चांदीचा ऐवज लुटल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र आता चक्क शेतकर्‍याच्या गोठ्यात बांधलेल्या सुमारे एक लाख रुपये किमतींच्या दोन जर्सी गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरापासून जवळच असलेल्या नेप्ती गावच्या शिवारात … Read more

साईबाबांच्या दर्शनाला जाण्यांपूर्वी जाणून घ्या दर्शनाची वेळ

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक कठोर नियमांची अमलबजावणी करण्यात आली आहे. यातच करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिर प्रशासनाच्या वतीने एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. यापुढे भाविकांना साईंचे दर्शनासाठी समाधी मंदिर सकाळी ७.१५ ते रात्री ७.४५ यावेळेत खुले राहणार आहे. तसेच श्री साईप्रसादालय हे सकाळी १० … Read more

कुटुंबाला मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-राहूरी तालुक्यातील चिंचविहिरे शिवारात सचिन दत्तू शिंदे या तरुणास लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन दत्तू शिंदे या तरुणाने राहूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शिंदे याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, दि २७ मार्च रोजी माझा चुलत भाऊ … Read more

मंगलकार्यालय चालक आर्थिक संकटात; जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- शहरातील मंगल कार्यालय, हॉल, लॉन्स गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामुळे व्यावसाय बंद असल्याने आर्थिकदृष्ट्या होरपळून निघाले आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात शासनाचे टॅक्स, हॉलचा असणारा अवाढव्य खर्च, बँकांची कर्जामुळे मंगल कार्यालय मालक हे आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. कोविडचे संकट दूर होत असताना पुन्हा पेशंट वाढल्याने पुन्हा मंगल कार्यालय, हॉल चालक … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; मुद्देमाल केला जप्त

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर शिवारात काही इसम जुगार खेळत असल्याबद्दल श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथील पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव यांना माहिती मिळाली. यावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा घेतला. यावेळी मातापूर शिवारात बनकरवस्ती परिसरातील हाडोळ्याच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली काही इसम जुगार खेळत असल्याचे आढळून आले. … Read more

माहेरहून चार लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ; सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- विवाहितेचा चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेराहून चार लाख रुपये आणण्यासाठी सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. दरम्यान हि घटना संगमनेर तालुक्यातील पठारभागातील पोखरी बाळेश्वर येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोखरी बाळेश्वर येथील अनिता धनंजय डोळस (वय 24) हिचे धनंजय दगडू डोळस (रा.मांजरवाडी, नारायणगाव, ता.जुन्नर, … Read more

दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- भरधाव वेगातील मोटरसायकल स्वराचे दुचाकीवरील ताबा सुटल्याने मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला जाऊन रस्त्यानी जाणार्‍या अशोक सिताराम मांडगे ( वय 47 रा. माळकुप तालुका पारनेर ) यांना धडक दिली. दरम्यान या अपघातात एकजण जखमी झाला आहे. ही घटना बस स्टँडवर ओवर ब्रिजमध्ये देहरे येथे घडली होती. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, … Read more

मढीत मानापानाच्या ‘तणावात’ होळी पेटली!

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील मढी येथील गोपाळ समाजाची मानाची होळी मानपानाच्या किरकोळ कारणावरून ताणतणावातच पोलिस बंदोबस्तत पेटली. कोरोच्या पार्श्वभूमीवर शासनाने मढी यात्रेला बंदी घातल्याने फक्त गोपाळ सामाजाच्या मानकऱ्यांना होळीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात आला होता. रविवारी सायंकाळी पाच वाजता गोपाळ बांधव कडेकोट पोलिस बंदोबस्तात मानाच्या गोवऱ्या घेण्यासाठी कानिफनाथ गडावर आले. यावेळी देवस्थान … Read more

वाळू माफियांवर महसुल मंत्री काहीच बोलायला तयार नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- वाळु माफियांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. यातुनच गावपातळीवर गुन्‍हेंगारी वाढत चालली असून, गावपुढा-यांची दादागिरीही वाढली आहे. या वाळू माफियांवर महसुल मंत्री काहीच बोलायला तयार नाहीत, सरकारही मुकगिळून गप्‍प आहे. वाळु वाहाणार्‍या बगलबच्चांना पोसण्याचे काम सध्या सुरु असल्याचा थेट आरोप भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. श्री … Read more

जिल्ह्यात रात्री नऊ ते सकाळी सहा संचारबंदी ! जिल्हाधिकारी भोसले यांचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढीची शक्यता लक्षात घेत शासन निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी खबदारीचे आणखी एक पाऊल उचलले आहे. येत्या दि. १५ एप्रिलच्या कालावधीत जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी जारी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत सार्वजनीक ठिकाणी फिरण्यास मनाई केली आहे. … Read more

दुकानदार, फळे व भाजी विक्रेते या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांची बेफिकीरी काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. यामुळे कोरोनाचे संक्रमण आणि वाढती आकडेवारी यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नुकतेच नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रशासन सतर्क झाले आहे. तालुका पातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ शहरात सात दिवसांचा लॉकडाऊन!

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-जिल्ह्यातील राहाता तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोना रूग्ण वाढत आहेत. यात राहाता शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने राहाता नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी अजित निकत यांनी ३० मार्च ते ५ एप्रिलपर्यंत शहरात सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना सात दिवस बंद राहणार … Read more

जिल्ह्यातील ‘या’ शहरात सात दिवसासाठी लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-जिल्ह्यात करोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेतच, शिवाय सक्रिय रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढू लागली आहे. राहाता शहर व परिसरात कोरोना रुग्णांचा आलेख वाढता आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिक काटेकोरपणे करीत नाहीत. यामुळे राहाता शहर ३० मार्चपासून सात दिवस लॉकडाऊन करण्याचा … Read more

निर्णायक सामना : इंग्लंडला विजयासाठी ३३० धावांचं आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- भारत आणि इंग्लड संघात आज वनडे मालिकेचा तिसरा व अखेरचा सामना खेळला जात आहे. एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक लढतीत भारतीय संघानं इंग्लंडसमोर विजयासाठी ३३० धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीने शतकी भागिदारी केल्याने भारतीय संघाची स्थिती मजबूत झाली. … Read more

सोन्याचे दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या दर

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोने ५६,३१० च्या उच्चांकावर पोहोचले होते, पण त्यानंतर मात्र यात सातत्याने घसरण होत आहे. सध्या सोन्याची किंमत ४५ हजाराच्या आसपास पोहचली आहे. चांदीच्या किंमतीतही साधारण १० हजार रुपयांची घट झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ४४००० रुपये इतका झाला आहे. गोल्ड रिर्टन या वेबसाईटच्या माहितीनुसार शनिवारी मुंबईत २४ … Read more

गुरुजींचा गोंधळ कायम ; विरोधकांनी थेट ऑनलाईन सभेत येऊन…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत विषय मंजुरीवरून वाद निर्माण झाला. यावेळी आक्रमक विरोधकांनी थेट ऑनलाईन सभेत येऊन संचालक मंडळाला धारेवर धरले. दरम्यान जिल्हा प्राथमिक बँकेची सभा अध्यक्ष राजू राहाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत विषय मंजुरीवरून वादंग सुरु झाले. दुपारी बाराला सुरु झाले होते. यावेळी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या’ गावात कोरोनाचा विस्फोट : ८ दिवस गाव बंद!

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- नगर तालुक्यातील अरणगाव येथ कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असल्याने प्रशासनाच्या वतीने अरणगाव आठ दिवसासाठी बंद करण्यात आले आहे. येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोनशेच्यावर गेल्याने तालुका प्रशासनाने गावात ८ दिवस कंटेन्टमेंट झोन जाहीर केला आहे. नगर शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शेकडो रुग्ण … Read more