लक्ष द्या… आजपासून आठच्या आत घरात ; नाहीतर चोप मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- राज्यात मोठ्या प्रमाणात कोविड बाधित समोर येवू लागल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घेत आजपासून राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीसाठी निर्बंध घातले आहेत. हा आदेश पुढील 15 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात लागू राहणार आहे. या नियमांमुळे आजपासून प्रत्येकाला आठच्या आत घरात यावे लागणार आहे. कोरोनाच्या … Read more

घाटात ट्रक उलटला; तिघे बालबाल बचावले

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी घाटातील अवघड वळणावर लोखंडी प्लेटाचे रोल घेऊन जाणारा ट्रक उलटला. वळणाला मोठा कठडा असल्याने त्यात ट्रक अडकल्याने तिघे बचावले. याबाबत अधिक माहिती अशी कि, कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी घाटात लोखंडी प्लेटाचे रोल पुण्याहून परभणीला घेऊन जाणारा ट्रक अवघड वळणाचा चालकास अंदाज न आल्याने उलटला. या ट्रकमध्ये चालक, … Read more

जुन्या वादातून तरुणास टोळक्याने मारहाण केली

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- मागील भांडणाच्या कारणातून विवाहित तरुणास टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर येथे घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आप्पाजी बाबाजी देवकर (वय 25, रा.जांबुत बु. धनगर वाडा) यांचे पत्नीसोबत दोन महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. तेव्हापासून पत्नी माहेरी … Read more

मोठी बातमी ! लॉकडाऊनबाबत नियोजन करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ८५७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८४ हजार ३६१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.९१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १२२८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५२४२ … Read more

मंत्री थोरातांनी घेतला कोरोना उपाययोजनांचा आढावा

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाला अधिक सतर्क करण्यासाठी शुक्रवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमृतवाहिनी कॉलेज येथे आढावा बैठक घेऊन प्रादुर्भाव, लसीकरण व उपाय योजनांचा आढावा घेतला. या बैठकीतून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.लग्न समारंभ पोलिसांच्या परवानगी शिवाय होणार नाहीत. शहरात २६ ठिकाणी खासगी कोरोना … Read more

अहमदनगरकरांना ज्याची भीती होती तेच झाल ! जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी …

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-  सध्या देशभरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. तर राज्यातही मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्णवाढ कायम असून कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.  गेल्या चार दिवसात जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम असून आजही तब्बल 1228 रुग्ण वाढले आहेत. तालुकानिहाय … Read more

दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ, सात जणांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-फळे पिकवण्यासाठी लागणारा एसी आणण्यासाठी व घर बांधण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरकडील पती व सासु – सासऱ्यासह एकुण सात जणांवर विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, जामखेड माहेर असलेली फिर्यादी विवाहित महिला नाजमीन … Read more

‘सर्वसामान्यांना त्रास झालेला मी सहन करणार नाही’: ना.तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- रेशनकार्डच्या कामांत दिरंगाई केल्याने ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी थेट तहसील कार्यालयात जाऊन रेशनकार्ड संबंधीचे दप्तर तपासून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. राहुरी तहसील कार्यालयात रेशनकार्डच्या कामांत दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी मंत्री तनपुरे यांच्याकडे केल्या होत्या. त्यामुळे ना.तनपुरे यांनी थेट तहसील कार्यालयात जाऊन रेशनकार्ड संबंधित दप्तर तपासणी … Read more

लॉकडाऊन झाले तर आता काय करायचे, या भीतीने…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लादताच परत एकदा लॉकडाऊन झाले तर आता काय करायचे, या भीतीने नागरिकांनी हात आखडता घेतला आहे. यामुळे सर्वत्र व्यवहार थंडावले असून गेल्या वर्षाप्रमाणेच मार्चच्या शेवटी कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांना परत एकदा आर्थिक संकटास तोंड देण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी … Read more

सत्तेत आल्यावर तुम्ही सर्व विसरलात मात्र जनता तुम्हाला योग्य वेळी आठवण करुन देईल…!

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- आज चौहोबाजुंनी शेतकरी समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. या संकटातुन त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे तर दुरच मात्र महावितरणकडून याच शेतकऱ्यांकडून पठाणी वसूली करत रोहित्र बंद करणे, त्यांचे वीज कनेक्शन कट करण्याचे गंभीर प्रकार महाविकास आघाडीच्या काळात वीज वितरण कंपनीकडून केले जात आहेत. तरी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेतीपंपाचे … Read more

‘त्या’ शेतकऱ्यांना दिलासा! अतिवृष्टीने नुकसानग्रस्त ‘या’ तालुक्यातील १४ गावांना आले ३४ लाख

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-  मागील वर्षाच्या रब्बी हंगामातील गहु, हरबऱ्याचे अतीवृष्टीने नुकसान झाल्याने शेवगाव तालुक्यातील शेतकरी हतबल झाला होता. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देत सभापती डॉ.क्षितिज घुले यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील त्या १४ नुकसानग्रस्त गावाना ३४ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात बळीराजाने मोठ्या कष्टाने … Read more

दुष्काळात तेरावा :’ते’ फळे खरेदीसाठी थांबले अन् चोरांनी डाव साधला !

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- रस्त्याच्याकडेला दुचाकी उभी करून समोर असलेल्या फळविक्रेत्याच्या गाडीवर फळे खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका जणाला फळे खरेदी करणे चांगलेच महागात पडले आहे. फळे करून परत येईपर्यंत मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेले १ लाख ४० हजारांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना श्रीरामपूर मेन रोड येथे घडली. याप्रकरणी सदाफळ यांनी दिलेल्या … Read more

कोरोना व्हायरसमध्ये बदल संसर्गाचे प्रमाण वाढते असून कुटुंबाचे…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- सध्या कोरोना व्हायरसमध्ये बदल झाला असून त्याच्या संसर्गाचे प्रमाण वाढते असून कुटुंबाचे कुटुंब बाधित होत असल्याचे समोर येत असून त्यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी केले. श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाचे आकडे आता वाढण्यास सुरुवात झाली असून श्रीरामपूर तालुक्याची वाटचाल हॉटस्पॉटच्या दिशेने सुरू … Read more

त्या एका कारणामुळे शिधापत्रिकाधारकांमध्ये संताप

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-  पाथर्डी तालुक्यात शिधापत्रिका शोध मोहीमे अंतर्गत बोगस शिधापत्रिका धारक उजेडात यावेत म्हणून मागील पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार मार्फत प्रत्येक शिधापत्रिका धारकाचा स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा पासपोर्ट फोटोसह आधारकार्ड वीजबिलाची झेरॉक्ससह अनेक कागदपत्रे जोडून तो फार्म शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्य दुकानदारकडे जमा केले. हे अर्ज भरून देताना सर्वसामान्यांसह … Read more

आमदार अरुण जगताप यांचे नगरच्या विकासात मोठे योगदान

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- गेल्या अनेक वर्षापासून शहराचे प्रश्न सोडववून विकास कामांना प्राधान्य देणारे आमदार अरुण जगताप यांचे नगरच्या विकासात मोठे योगदान आहे. भेदभाव न ठेवता आलेल्या प्रत्येकाचे ते प्रश्न सोडवत असतात. सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, क्रीडा व राजकारण अशा सर्वच क्षेत्रात आमदार अरुण जगताप आज अग्रस्थानी आहेत, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष … Read more

नागवडे कारखान्याच्या बैठकीत पाहायला घाणेरडे राजकारण !

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- नागवडे कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यात आली. या सभेला कारखाना प्रशासनाने आजी-माजी सभासदांना, आमदारांना निमंत्रण देणे गरजेचे असताना मर्जीतील ठरावीक लोकांनाच सभेची ऑनलाइन लिंक पाठवत झालेल्या बैठकीत घाणेरडे राजकारण पहावयास मिळाले. आगामी नागवडे कारखाना निवडणुकीत केशव मगर, अण्णासाहेब शेलार यांच्या बरोबर राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांनी पत्रकार … Read more

विवाहितेला मारहाण करणाऱ्या पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली पाहायला मिळते आहे. यातच असाच एक प्रकार नुकताच जिल्ह्यात घडला आहे. माहेरून पाच लाख रुपये आणले नाही म्हणून ३६ वर्षीय विवाहित तरुणीला मारहाण करणाऱ्या पतीसह आठ जणांविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विवाहितेने पोलिसात फिर्याद दिली. … Read more