चांगल्या नेत्याचे करोनाने झालेले निधन वेदानादायी – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-तीन वेळा खासदार राहिलेले दिलीप गांधी यांना मोठा जनाधार होता. गेली लोकसभा निवडणुक जर त्यांनी लढवली असती तर त्यातही ते निश्चित विजयी झाले असते. अशा चांगल्या नेत्याचे करोनाने झालेले निधन वेदानादायी आहे, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्व. दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. माजी केंद्रीय मंत्री असलेले … Read more

दिवसभरात कोपरगावात नव्याने ८० बाधितांची भर

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातच दरदिवशी धडकी भरवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. यामुळे नागरिकांसह प्रशासनामध्ये देखील धाकधूक वाढली आहे. कोपरगाव शहरासह तालुक्यात शनिवारी कोरोनाच्या ८० बाधित रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून बाधित रुग्णाची संख्या ५०३ इतकी झाली आहे. शनिवारी रॅपिड अँटीजेन किट तपासणीत … Read more

आठ दिवसांत तब्बल सव्वा लाखाचा दंड वसूल

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-नगर शहरासह जिह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाटय़ाने वाढू लागली. कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना नियमांचे प्रभावी पालन व्हावे, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर व्हावा, गर्दी नियंत्रणात यावी, यासाठी महानगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून, महापालिकेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आठ दिवसांत … Read more

धोका वाढला : कोरोनासोबत करावा या गोष्टीचा सामना !

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-देशभरात सध्या कोरोना संसर्ग वेगाने वाढत असून रोज धक्कादायक असे रुग्णसंख्येचे आकडे समोर येत आहेत मात्र कोरोना संकट सुरु असतानाच आणखी एक संकट ह्या वर्षी आपाल्याला भोगावे लागणार आहे. यंदा मार्च महिना संपण्याआधीच राज्याच्या विविध भागांत उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. जागतिक हवामान जोखीम निर्देशांकानुसार (ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स) भारत … Read more

दरोड्याच्या तयारीतील चौघांना पोलिसांनी पकडले तर दोघे फरार

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-संगमनेर तालुक्यात दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांपैकी चौघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. तर दोघे जण फरार झाले आहे. दरम्यान संगमनेर पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास समनापूर बाह्यवळण ते पुणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर हि आक्रमक कारवाई केली. आरोपींवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. त्यांच्याकडील दुचाकी वाहन व तीन कोयते, एक गिलोर … Read more

आमदार निलेश लंके यांनी स्वतासह इतरांचाही जीव धोक्यात घातलाय !

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-आमदार नीलेश लंके यांनी रुग्णालयात उपचार सुर असलेल्या रुग्णांची कोणत्याही सुरक्षेविना भेट घेतली. त्यांच्यासोबत सेल्फीही घेतले. ‘मी असुरक्षित असलो तरी चालेल माझी जनता मात्र सुरक्षित असली पाहिजे” असे सांगत लंके यांनी ही भेट घेतली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी त्यांच्यासह इतरांचाही जीव धोक्यात घातला आहे. गेल्या महिनाभरात कोरोना रूग्णांची संख्या … Read more

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बहाद्दरांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर बनत चालली आहे, यामुळे पुन्हा एकदा कठोर नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. नुकतेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांनी नुकतेच … Read more

डॉ. सुजय विखे म्हणाले सहकार चळवळ संपवायला निघाले होते, मात्र आम्ही

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना खा. सुजय विखे म्हणाले की, सहकारी साखर कारखानदारीबाबत केंद्र सकारात्मक आहे. त्यांनी चांगले निर्णय घेऊन विकसात्मक पाऊले उचलली आहेत. अनेक जण सहकार चळवळ संपवायला निघाले होते.अनेकांनी स्वत:चे कारखाने काढले. आम्ही मात्र … Read more

पत्नीचे अनैतिक संबंध …. पतीने केली आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-वारंवार समजूत घालूनही पत्नीने तिचे परपुरुषासोबत असलेले अनैतिक संबंध बंद केले नाहीत. उलट तिने प्रियकराच्या मदतीने पतीलाच अनैतिक संबंधाच्या आड आल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर हतबल पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आष्टी तालुक्यात घडली. याप्रकरणी पत्नी आणि प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. मृत तरुणाच्या भावाने आष्टी पोलिसांत … Read more

तर मंत्रिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करून दाखवा…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-महाभकास आघाडीचे राज्याचे नेते तुम्ही स्वत:ला समजता, तर मंत्रिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करून दाखवा, असे थेट आव्हान पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे यांनी दिले. कालपर्यंत निळवंडे प्रश्नांवरून आम्हाला बदनाम करणारी मंडळी आता उशिरा का होईना कालव्यांच्या कामाबाबत खरे बोलू लागल्याने … Read more

बघा या’बंटी बबली’ची करामत ‘एटीएम हॅक करुन लावला तब्बल १० लाखांना चुना

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-आता पर्यंत आपण चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून, थेट मशीनच उचलून नेल्याच्या घटना घडल्याच्या ऐकल्या आहेत. पण एका आधुनिक बंटी बबलीने तर कहरच केला आहे. तो असा त्यांनी एटीएम मशीनच हॅक करुन १ हजार रुपयांच्या ५० ट्रांझेक्शनद्वारे तब्बल १० लाख रुपये काढून बँकेला चुना लावल्याचे समोर आले आहे. … Read more

शिक्षक बँक ताळेबंदातच महाघोटाळा !

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-प्राथमिक शिक्षक बँकेत अनेक घोटाळे करुण थकलेल्या महाभागी सत्ताधारी मंडळांनी शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी वार्षिक सभा अहवालाच्या ताळेबंदातच आता महाघोटाळा केला आहे. एक तर आपणाला प्रशासनाने अहवालच पाठविला नाही तो का पाठविला नाही याचे उत्तर आज शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळाला सापडले आहे. जिल्हयातील १२ हजार सभासंदांना सत्ताधाऱ्यांनी वेडे समजले आहे. … Read more

अबब: ‘हे’ आहे जगातील सर्वात महागडे युबरी खरबूज ; 20 लाख रुपये प्रतिकिलो

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-भारतातील बाजारामध्ये आढळणार्‍या फळांची किंमत साधारणत: प्रति किलो 200 ते 300 रुपयांपेक्षा जास्त नसते. काही फळ प्रति किलो 500-600 रुपयांपर्यंत महाग असू शकतात. परंतु आपण कधीही जगातील सर्वात महाग फळांबद्दल ऐकले नसेल, ज्याची 1 किलोची किंमत काही हजारात नव्हे तर लाखोंत आहे. त्या फळाच्या 1 किलो दरात आपण बरेच सोने … Read more

‘मला’ फक्त विकासाचे राजकारण करायचे आहे

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-लोकांना विश्वासाने दिलेला शब्द माझ्यासाठी महत्वाचा असतो त्यात कधी बदल होत नसतो.आता इथले राजकारण बदलेल आणि विकासाच्या राजकारणाकडे सर्वांचा कल राहील. लोकांच्या हितासाठी जातीय राजकारण नाही तर फक्त विकासाच राजकारण करायचय असे मत आ.रोहित पवार यांनी व्यक्त केले. कर्जत तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. आ.रोहित पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या … Read more

गोठ्यातून एक लाखाच्या गाई चोरल्या शहराजवळील ‘या’ गावातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या सुमारे एक लाख रूपये किमतीच्या दोन जर्सी गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना नगर तालुक्यातील नेप्ती या ठिकाणी शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत शेखर दत्तू महांडुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, नगर शहरापासून जवळच … Read more

महाविकास नव्हे; हे तर फसवे सरकार !  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची टीका 

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- शेतकऱ्यांना मदत करणे ही शासनाची भूमिका असावयास हवी, मात्र, महाविकास आघाडी सरकार हे सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचीच वीज खंडित करीत आहे. या सरकारमधील विविध पक्षांनी संपूर्ण कर्जमाफी व मोफत विजेचे आश्‍वासन दिले होते.  परंतु या शब्दाला जागणे दूरच उलट वीज रोहित्रे बंद करून कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. … Read more

सप्टेंबरपर्यंत सीरमची आणखी एक लस येणार

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोना व्हायरसची लस, कोवॅक्सिनची वैद्यकिय चाचणी सुरू होणार आहे. या वर्षी सप्टेंबरपर्यंत ही लस दाखल होऊ शकतो. ऑगस्ट २०२० मध्ये अमेरिकन लस कंपनी नोवावॅक्सनं सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियासह लायसेंस कराराची घोषणा केली होती. नोवावॅक्सनं हा करार कोविड १९ लस … Read more

महाराष्ट्रातील शेतक-यांच्या प्रश्नांकडे मंत्र्यांना पाहायला वेळ नाही…

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-महाविकास आघाडीचे राज्याचे नेते तुम्ही स्वत:ला समजता, तर मंत्रीमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करुन दाखवा असे थेट आव्हान पद्मश्री डॉ.विट्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. कालपर्यंत निळवंडे प्रश्नांवरुन आम्हाला बदनाम करणारी मंडळी आता उशिरा का होईना कालव्यांच्या कामाबाबत खरे बोलू लागल्याने त्यांच्या … Read more