पुणेकरांनो काहीतरी करा :  देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण पुण्यात

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-पूर्ण वर्षभर कोरोनाप्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे यावर्षी सुरूवातील काही दिवस दिलासदायक गेले. हळुहळू राज्यभरातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी देखील कमालीची घटली. त्यामुळे प्रशासनानेसुद्धा कोरोना नियम थोड्याफार प्रमाणात शिथील केले. पण हा दिलासा अल्पकाळच ठरला. त्यानंतर मात्र आता कोरोना गेला असेे समजून कोरोना प्रतिबंधात्मक नियम डावले अन् नागरिक बिनधास्त फिरू लागले … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावात जुळून आला असा योगायोग की; ज्यामुळे …

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-अकोले तालुक्यातील वाशेरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किरण गजे व उपसरपंचपदी अनिता गजे या पतीपत्नीची निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या दोन्ही प्रमुख पदावर पती व पत्नीची निवड होण्याचा हा प्रकार दुर्मिळच असला पाहिजे. गजे दाम्पत्याची नुकत्याच झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शिवराम डगळे व त्यांना सहायक म्हणून ग्रामसेविका नीलम … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन नाही ! मात्र… जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले..

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन करण्याचा विचार नाही, मात्र ‘कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल. नागरिकांनी परिस्थीतीचे गांभिर्य लक्षात घेत नियमांचे काटेकोर पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मनपा आयुक्त … Read more

एसबीआयमध्ये सॅलरी अकाउंट असेल तर ‘ह्यांना’ मिळेल 1 कोटींचा ‘हा’ फायदा

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-नोकरदार लोकांचे सॅलरी खाते असते ज्यात त्यांचा पगार येतो. या सॅलरी खात्यासह बँक बर्‍याच सुविधा देते. ही खाती झिरो बॅलन्सवाली आहेत. म्हणजेच त्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची सक्ती नाही. याशिवाय बँका आपल्या ग्राहकांना विशेष सुविधा पुरवतात. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) बद्दल आपण पहिले तर , ते … Read more

10 हजारांतही घरी आणू शकता ‘ही’ नवी कोरी इलेक्ट्रिक बाईक

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-भारतीय बाजारामध्ये इलेक्ट्रिक बाईकची मागणी वाढत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर झाला आहे. दुचाकी उत्पादक कंपन्याही याकडे विशेष लक्ष देत आहेत. जर आपण पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे कंटाळला असाल आणि इलेक्ट्रिक बाइक घेण्याचा विचार करत असाल तर आपण इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी कोमाकीकडून एमएक्स 3 बाईक खरेदी करू … Read more

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा देणारी बातमी आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान, तर इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान या नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. 10 वी आणि 12 वीचे जे विद्यार्थी कोरोनामुळे आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी … Read more

भारत बंदला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा; पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ मागे घ्या

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. तसेच केंद्र सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेले काळे कायदे रद्द करावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जाहीर केले आहे. … Read more

‘ह्या’ वेबसाइटवरून विकत घेतला आयफोन, त्यात अशी निघाली वस्तू की ती पाहून तुम्हीही व्हाल हैराण

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-आयफोनचा वापर आता खूप वाढला आहे. पूर्वीपेक्षा जास्त युजर्स आता आयफोन्स वापरत आहेत. अशा परिस्थितीत या फोनचे फेक वर्जनही बाजारात येत आहे. अशा बर्‍याच वेबसाइट्स आहेत ज्या बनावट आयफोनची विक्री करतात आणि त्यांच्या वेबवर लोकांची फसवणूक करतात. थायलंडमधील एका तरूणालाबाबतसुद्धा अशीच घटना घडली आहे. या तरूणाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन आयफोन खरेदी … Read more

‘ही’ कंपनी महिलांना देतेय काम करण्याची संधी ; जाणून घ्या ड‍िटेल

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-महिलांसाठी एक चांगली बातमी आहे. जर तुम्हाला एखादे काम करायचे असेल तर तुमच्यासाठी खरोखर एक चांगली बातमी आहे. फास्ट फूड रेस्टॉरंट चेन केएफसीने आपल्या रेस्टॉरंटमधील महिला कर्मचार्‍यांची संख्या दुप्पट करण्याची योजना आखली आहे. केएफसी रेस्टॉरंट्समध्ये पुढील 3-4 वर्षांत केएफसी रेस्टोरेंट मध्ये 5,000 महिला कर्मचारी असतील. कंपनीच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली … Read more

नगर – कल्याण रोडवर अपघातात एक ठार !

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-नगर-कल्याण रोडने भरधाव वेगाज जाणार्‍या कारने पायी चालणार्‍या 55 पादचार्‍यास धडक दिली. या धडकेत पादचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नगर – कल्याण रोडवरील धोत्रे शिवरामध्ये शुक्रवार दि.26 रोजी सकाळी 9.45 च्या दरम्यान घडली. माहिती अशी की, नगर कल्याण रोडवर धोत्रे गावच्या शिवारात सोन्याबाप्पू राहिंज (वय 55 वर्ष) रा. धोत्रे … Read more

३१ मार्चपर्यंत कर्ज भरा, पुन्हा कर्ज देऊ …

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथील भैरवनाथ बेलवंडी सहकारी सेवा संस्थेला नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे आणि जिल्हा बँकचे नूतन संचालक माजी आमदार राहुल जगताप यांनी सदिच्छा भेट देऊन संस्थेने स्वभांडवलातून सुमारे दीड कोटी रुपये खर्चून उभारलेल्या संस्थेच्या कार्यालय इमारतीचे पाहणी केली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे तसेच जिल्हा … Read more

आज ६४३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८२९ बाधितांची रुग्ण संख्येत भर !

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ६४३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८२ हजार ७३९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८२९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४९८५ इतकी … Read more

भारी ! इलेक्ट्रिक कार विसरा, मारुती ‘ह्या’ सीएनजी वाहनांवर देतेय 40 हजारांची सूट

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-कंपन्या आता हळूहळू कोरोना साथीच्या काळात ऑटो विक्रीमध्ये झालेल्या नुकसान भरून काढत आहेत. वाहन विक्री पुन्हा एकदा उच्चांकास स्पर्श करते. प्रत्येक निर्मात्याने त्यांच्या वाहनांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. जास्त मागणीमुळे, कार उत्पादक आता त्यांच्या वेगवेगळ्या कारवर फायदे आणि सूट जाहीर करीत आहेत. जानेवारी 2021 मध्ये मारुती सुझुकीची … Read more

ट्रॅक्टर दुकानात घुसला, अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणची घटना

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-कोल्हार येथे विना चालकाचा ट्रॅक्टर अनेक दुकानांत घुसला. दैव बलवत्तर म्हणून कुठलीही हानी झाली नाही. मात्र या घटनेत वित्तहानी झाली आहे. वाहनाचा फिटर व चालक यात कोणाचा दोष हीच चर्चा आहे. गुरुवारी दुपारी नगर मनमाड रस्त्यावरील कोल्हार येथे एक ट्रॅक्टर नादुरुस्त झाला. त्याचे दुरुस्तीचे काम येथील एक फिटर रस्त्यालगत करीत … Read more

होळी ऑफर: आयफोन 11 बंपर सूट ; जाणून घ्या …

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-Apple हा भारतातील सर्वाधिक पसंती असणारा ब्रँड आहे. आयफोन असण्याचे प्रत्येकाचे स्वप्न आहे. आपे देखील आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न असल्यास, आपल्याकडे आत्ताच चांगली संधी आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर Apple आयफोनवर डिस्काउंट दिला जात आहे. 13 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटमध्ये आयफोन मिळवा :- तुम्हाला होळीच्या निमित्ताने फोन घ्यायचा असेल तर तुमच्याकडे सध्या … Read more

मंत्री तनपुरे यांच्या प्रयत्नांनी ‘त्या’ देवस्थानला निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील श्रीक्षेत्र ढोलेश्वर देवस्थानच्या विकासासाठी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता त्यापैकी शासनाकडून काही निधी प्रलंबित राहिल्यामुळे येथील विविध विकास कामे रखडली होती. परंतु येथील ग्रामस्थांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे रखडलेला निधी पुन्हा एकदा संबंधित विभागाकडे वर्ग झाला आहे. लवकरच उर्वरित कामे देखील … Read more

मालामाल ! ‘ह्या’ शेअरमध्ये केवळ 10 रुपये गुंतवून गुंतवणूकदारांनी कमवले 28000 रुपये

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-एक काळ असा होता की शेअर मार्केटला जुगार असे म्हणत. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आणि शेअर बाजार हे गुंतवणूकीचे साधन बनले आहे. मोठ्या गुंतवणूकदारांबरोबरच आता छोटे गुंतवणूकदारही यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. हेच कारण आहे की यावेळी भारतीय शेअर बाजाराचे आकारमान भारतीय अर्थव्यवस्थेच्या आकारमानाइतके आहे. या लेखात आम्हाला … Read more

पाच वर्षात आपलेही रस्ते ‘त्यांच्या’सारखे होतील ! केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री गडकरी यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-आगामी पाच वर्षांमध्ये देशातील पायाभूत सुविधा अमेरिका आणि युरोप सारख्या होतील. नव्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही एक भक्कम पाया तयार केला आहे. गेल्या ५ वर्षात १७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. आताच्या घडीला देशात रस्ते आणि पायाभूत सुविधांचे … Read more