342 रुपयांच्या प्रीमियमवर तुम्हाला 4 लाख रुपयांचा लाभ ; ‘असा’ घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आली. 21 व्या शतकातसुद्धा या अत्यावश्यक आर्थिक उत्पादनापासून दूर असणाऱ्या देशातील नागरिकांना विम्याच्या कक्षेत आणणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. ही एक वर्षाची जीवन विमा योजना  आहे जी जीवन विमा संरक्षण प्रदान करते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लग्नाचे नाटक करून लुबाडणारी टोळी !

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-लग्नाचे नाटक करून लुबाडणारी टोळी कर्जत पोलिसांकडून जेरबंद करण्यात आली. कर्जत तालुक्यातील एका मोठ्या गावातील एका युवकाला या टोळीने सावज केले. ही परभणी येथील टोळी तेथे लग्न जमवण्यासाठी गेली आणि लग्न जमवले. या लग्नासाठी या टोळीने नवऱ्या मुलांकडून दोन लाख दहा हजार रुपये घेतले. लग्न उरकण्यात आले. काही दिवसात नवरी … Read more

सुखदवार्ता : नगरमध्ये फळांना मिळतोय उच्चांकी दर!

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या फळांचा चांगले दर मिळत आहेत. मात्र सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने बाजारात फळांची आवक काहीशी मंदावली आहे. परिणामी आवक कमी होत असल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळेच फळांव भाव वधारले आहेत. सध्या डाळिंब १६०००, संत्रा १०,००० सफरचंद १२०००, मोसंबी ७५०० या फळांना उचांकी दर मिळत आहेत. आज … Read more

एलआयसी होम लोन घेणाऱ्यांसाठी खूप मोठी बातमी ; वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-जीवन विमा कॉर्पोरेशनच्या हाउसिंग फाइनेंस युनिट एलआयसी हाउसिंग फायनान्सने Griha Varishtha योजनेंतर्गत गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने या योजनेंतर्गत कर्ज घेणाऱ्यांसाठी 6 ईएमआय माफ करण्याची घोषणा केली आहे. गृह वरीष्ठ योजनेचा लाभ अशा सैलरीड इंडिविजुअल व निवृत्तीवेतनधारकांना मिळतो जे लाभार्थी डिफाइन्ड बेनिफिट पेंशन स्कीम अर्थात DBPS योजनेत … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीशांनी घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- सध्या राज्यभरात कोरोनाचे रूग्ण प्रचंड वेगाने वाढत आहेत. जिल्ह्यात देखील कोरोनाबाधितांची संख्या चांगलिच वाढलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अहमदनगर व संगमनेर येथील सत्र न्यायालयाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दिवसातून दोन सत्रांमध्ये कामकाज चालेल. असा आदेश प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी काढला आहे. पहिल्या सत्राचे कामकाज … Read more

‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-  सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. तसेच केंद्र सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेले काळे कायदे रद्द करावेत, आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जाहीर केले आहे. शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला … Read more

कोरोना तपासणीचा सावळागोंधळ एकच व्यक्ती जिल्हा रुग्णालयात निगेटिव्ह, तर खाजगी लॅबमध्ये ठरला पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-  शहरात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना, एकाच दिवशी एका व्यक्तीने केलेल्या कोरोना चाचणीचा जिल्हा रुग्णालयातील अहवाल निगेटिव्ह, तर खाजगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आल्याने, अशा दोन प्रकारच्या अहवालाबाबत संशय निर्माण झाला आहे. यासंदर्भात चौकशी करुन चुकीचा अहवाल देणार्‍या लॅबचे रजिस्ट्रेशन रद्द करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन विश्‍व मानवाधिकार परिषदच्या वतीने … Read more

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे ‘या’ अवयवांवर करतात परिणाम

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-देशात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे उलट्या, अस्वस्था, पोटदुखी आणि अतिसाराचा सामना करावा लागत आहे. या नव्या स्ट्रेनचा थेट परिणाम घसा, फुफ्फुस आणि मेंदूवर होतो. त्यामुळे उलट्या, पोटदुखीचा त्रास होत असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणे आहे. दिल्लीत नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळून आली आहेत. नवी लक्षणं असलेल्या … Read more

किती हा हव्यास! डॉक्टर स्वतः कोरोनाबाधित असतानाही अनेकांची केली तपासणी!

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-दिवसेंदिवस राज्यभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे प्रशासन या वाढत्या कोरोचा विळखा सोडवण्यासाठी अहोरात्र महेनत करतांना दिसत आहे. तर दुसरीकडे काहीजण केवळ पैसे कामावन्याच्या नादात नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अन शहरातील एका नामाकिंत हॉस्पिटलचे डॉक्टर हे स्वतः कोरोना … Read more

सशस्त्र टोळीचा कलाकेंद्रावर राडा !

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- नगर तालुक्यातील नांदगाव येथील ओम भगवती कलाकेंद्राच्या बाहेर सहा जणांच्या टोळीने धुमाकूळ घालत वाहनांचे नुकसान केले. एकास तलवारीचा धाक दाखवून १२ हजार २५० रूपये लुटले. बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी सतीष महेश काळे (वय २८ रा. वाळवणे ता. पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात सहा … Read more

नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई ; सात दुकाने केली सील

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची भयानक आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र अनेकजण कोरोनाच्या नियमनाचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. पाषाणावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. नुकतेच जामखेड तालुक्यातील खर्डा येथे प्रांताधिकाऱ्यांच्या पथकाने कोरोना नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली. यावेळी साडेपाच हजाराचा दंड … Read more

श्रीगोंद्यात साडेसहा हजार नागरिकांनी घेतली कोरोनाची लस

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणाचाही वेग वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत युद्धपातळीवर सुरु आहे. यातच जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आतापर्यंत ६ हजार ७१६ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून ४५ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांना १ एप्रिलपासून लसीकरणाची सुरुवात होणार आहे. ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ३३ … Read more

जिल्ह्यातील हा तालुका ठरतोय कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-राहाता तालुक्यात मोठ्या प्रमाणावर करोना रूग्ण वाढत असून राहाता शहरात रोज पंचवीसच्या पुढे रुग्ण आढळत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार राहाता तालुक्यात करोनाचा उद्रेक झाला असून गेल्या 24 तासात तालुक्यात तब्बल 140 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. रुग्णाची दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता नगर जिल्ह्यातील हा तालुका लॉकडाऊनकडे वाटचाल करताना दिसून … Read more

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात बसणार उपोषणाला

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-कृषी कायदे, कामगार कायदे यासारख्या जाचक कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलने सुरूच आहे. आता याच मुद्यावरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे देखील उपोषण करणार आहे. दरम्यान थोरात हे श्रीरामपुरात उपोषणाला बसणार आहे. सविस्तर वृत्त असे कि, केंद्र सरकारने विना चर्चेने पास केलेले तीन शेतकरी व कामगार विरोधी काळ्या कायद्याच्या निषेधार्थ आणि मागील … Read more

श्रीरामपूर तालुक्यात करोनाचे 69 रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-जिल्ह्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे मोठी चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारी पाहता जिल्ह्यात लॉकडाऊन होणार कि काय ? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान श्रीरामपूर तालुक्यात गेल्या 24 तासात करोनाचे नवीन 69 रुग्ण सापडले आहेत. तर 325 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये … Read more

100 टक्के इंधन म्हणून इथेनॉल वापरण्यास केंद्र सरकारची परवानगी

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-पेट्रोल-डिझेलप्रमाणे 100 टक्के इंधन म्हणून इथेनॉल वापरण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याने नगर जिल्ह्यातील साखर कारखाने आणि लाखो शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक 23 साखर कारखाने आहेत. यापैकी 9 साखर कारखान्यांकडे इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प आहेत. यात नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर (लोकनेते मारूतराव घुले पाटील), प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे … Read more

कोर्टात जाण्यांपूर्वी हे वाचा; वेळेत झालाय हा बदल

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अहमदनगर व संगमनेर येथील सत्र न्यायालयाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पहिल्या सत्राचे कामकाज सकाळी साडेदहा ते दुपारी एक यावेळेत तर दुपारच्या सत्राचे कामकाज दुपारी दीड ते सायंकाळी चार यावेळेत चालणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवसब वाहू लागले आहे. यातच गेल्या चार दिवसांपासून नगर जिल्ह्यातून धडकी भरवणारी … Read more

दोन बिबट्यांची जुंपली झुंज; या तालुक्यातील थरारक प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-राहाता तालुक्यातील एकरुखे येथे एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला असल्याची माहिती समोर येते आहे. दरम्यान मृत बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती याबाबत अधिक माहिती अशी कि, एकरूखे गावातील अस्तगाव रोडवरील शेतकरी सुधाकर जगन्नाथ सातव यांच्या शेतात काल दि. 25 रोजी नेहमीप्रमाणे रोहिणी सातव या गेल्या असता त्यांना … Read more