कर्जत महावितरणाचा अजब कारभार!, भूमिहिन शेतकऱ्याला पाठवले चक्क तीन लाखांचे वीज बिल

Ahilyanagar News: कर्जत- तालुक्यातील चिलवडी येथील भूमिहीन रहिवासी हरिश्चंद्र भीवा फरांडे यांना महावितरण कंपनीने कृषिपंपाच्या थकबाकीपोटी तीन लाख रुपयांचे वीज बिल भरण्याची नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे, फरांडे यांच्या नावावर ना जमीन आहे, ना विहीर, ना कृषिपंप, तरीही त्यांना ही नोटीस मिळाली आहे. गेली चार वर्षे ते या चुकीच्या बिलाचा पाठपुरावा करत असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून … Read more

अहिल्यानगरमध्ये रात्री अवैध लाकूड वाहतूक! वनविभाग मात्र झोपेतच, लाकूड टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जवळा परिसरात अवैध लाकूड वाहतूक आणि वृक्षतोड पुन्हा एकदा वन विभागाच्या कारवाईला आव्हान देत आहे. वन विभागाने अवैध वृक्षतोडीविरुद्ध पाहणी मोहीम सुरू केली असताना, १० मे २०२५ रोजी रात्री जवळा परिसरात एका ट्रॅक्टरद्वारे अवैध लाकूड वाहतूक होत असल्याचे उघड झाले. ही घटना तस्करांच्या वाढत्या धाडसाचे द्योतक आहे आणि वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह … Read more

ATM वरचं Cancel बटन दोनदा दाबलं तर तुमचा पिन सुरक्षित राहतो का? काय आहे सत्य? वाचा

एटीएम कार्ड मशिनमध्ये टाकण्यापूर्वी दोनदा कॅन्सल बटन दाबा, त्यामुळे तुमच्या एटीएम कार्डचा पिन सुरक्षित राहील, असा मॅसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. विशेष म्हणजे ही माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिली असल्याचा दावाही, या मॅसेजमध्ये करण्यात आला होता. परंतु हा मॅसेज खरा आहे का? हा प्रश्न सर्वांनाच पडला. आता याच प्रश्नाचं उत्तर पीआयबीनं … Read more

संगमनेर : 50 लाख रुपये निधी खर्चून अद्यावत उभारलेली सीसीटीव्ही यंत्रणा बंद का ?

Sangamner News : लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे वैभवशाली व सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संगमनेर शहरांमध्ये 50 लाख रुपये निधीतून अद्यावत अशी सीसीटीव्ही यंत्रणा व कंट्रोल रूम उभारण्यात आली. ही सीसीटीव्ही यंत्रणा पोलीस प्रशासनाकडे हस्तांतरित असून सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही सीसीटीव्ही यंत्रणा बंद का असा परखड सवाल … Read more

भारतातल्या या मोठ्या कार कंपनीने बिघाड झाल्यामुळे तब्बल ४७००० हजार गाड्या मागवल्या परत

स्कोडा आणि फोक्सवागेन इंडियाने मागील सीटबेल्टमधील तांत्रिक दोषामुळे त्यांच्या अनेक लोकप्रिय मॉडेल्सच्या ४७,००० हून अधिक गाड्या परत मागवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या मोहिमेत स्कोडा कायलॅक, कुशाक, स्लाव्हिया आणि फोक्सवागेन टिगून, व्हर्टस या मॉडेल्सचा समावेश आहे. २४ मे २०२४ ते १ एप्रिल २०२५ या कालावधीत उत्पादित झालेल्या वाहनांमध्ये मागील सीटबेल्टच्या बकल लॅच प्लेट आणि वेबिंगमध्ये … Read more

एसटी कामगारासांठी नवी संघटना ! राष्ट्रीय कर्मचारी सेना

एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न वर्षांनुवर्षे जैसे थे आहेत. सदरचे प्रश्न सुटत नसल्याने कर्मचारी हतबल झाला आहे. कामगारांना राष्ट्रीय कर्मचारी सेनेचा पर्याय निर्माण झाल्याने असंख्य कर्मचारी या संघटनेकडे जात आहेत. एसटी कामगारांसाठी ही नवी संघटना कार्यरत झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा हजार … Read more

गुड न्यूज ! MPSC कडून पहिल्यांदाच एवढी मोठी भरती, ‘या’ पदाच्या 2 हजार 795 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, कोणाला अर्ज करता येणार ? वाचा….

MPSC News

MPSC News : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजे MPSC च्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एमपीएससी कडून नुकतीच एक मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब अशी की, इतिहासात पहिल्यांदाच एमपीएससीकडून एवढ्या मोठ्या पदांसाठी एकाच वेळी जाहिरात काढण्यात आली असून यामुळे सध्या विद्यार्थ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. खरे … Read more

Baba Vanga Predictions : पृथ्वीवर येणार महासंकट ! बाबा वेंगांच्या इशाऱ्यामुळे वाढली चिंता

Baba Vanga Predictions : आपण चंद्राकडे अनेक नजरेने पाहतो—प्रेम, कला, विज्ञान आणि अध्यात्म यांचं प्रतीक म्हणून. कवितांमध्ये, गाण्यांमध्ये आणि आपल्या रोजच्या आयुष्यातही चंद्राला एक खास स्थान आहे. मात्र, जर एखाद्या दिवसापासून चंद्रच अस्तित्वात नसेल, तर? ही कल्पना केवळ विचित्र नाही, तर धक्कादायक आहे. आणि ही कल्पना उगाच नाही, तर जगप्रसिद्ध अंध भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या … Read more

फक्त 10 मिनिटांत मिळवा 1 कोटींचं लोन; जिओ फायनान्शिअलची नवी योजना आहेत तरी काय?

Jio Financial Loan Service | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या मुकेश अंबानी यांच्या कंपनीने आर्थिक जगतात एक मोठं पाऊल उचललं आहे. आता तुम्ही तुमच्या शेअर्स किंवा म्युच्युअल फंड तारण ठेवून घरबसल्या अवघ्या 10 मिनिटांत 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज घेऊ शकता. कंपनीने ही सुविधा पूर्णपणे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांनी जिओ फायनान्स अ‍ॅपचा वापर … Read more

UPI झालं डाऊन! लाखो युजर्सना व्यवहार करता येईना, वाचा काय आहे कारण आणि कधी सुरु होणार सेवा?

English Title: UPI Outage | देशभरातील लाखो नागरिकांसाठी आजचा दिवस डिजिटल पेमेंटच्या बाबतीत काळजीचा ठरला आहे. गुगल पे, फोनपे, पेटीएम यांसारख्या प्रमुख UPI आधारित अ‍ॅप्स अचानक बंद पडल्यामुळे नागरिकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. या तांत्रिक अडचणीमुळे छोट्या दुकानदारांपासून ते प्रवाशांपर्यंत सर्वांनाच मोठा फटका बसला आहे. तक्रारींचा अक्षरशः पूर UPI प्रणालीच्या अचानक बिघाडामुळे सोशल मीडियावर याबाबत … Read more

क्रेटाने रचला इतिहास! टॉप 10 SUV ला पछाडत विक्रीत ठरली नंबर 1, असं काय आहे Hyundai Creta मध्ये?

Hyundai Creta | मार्च 2025 मध्ये भारतीय SUV बाजारात एकच नाव सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलं – Hyundai Creta. दमदार लूक, उत्कृष्ट फीचर्स आणि परफॉर्मन्समुळे ही SUV देशात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. मार्च महिन्यात क्रेटाने तब्बल 18,059 युनिट्सची विक्री करत विक्री यादीत पहिलं स्थान पटकावलं. ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत 10 टक्क्यांनी जास्त आहे, कारण … Read more

गुरु प्रदोष व्रत 2025: अविवाहित मुलींनी करावा ‘हा’ उपाय, महादेवाच्या कृपेने मिळेल मनासारखा जोडीदार

Guru Pradosh 2025 | प्रदोष व्रत हे भगवान शिव यांना समर्पित एक अत्यंत शुभ व्रत मानले जाते. सनातन धर्मानुसार हे व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला साजरे केले जाते. दर महिन्यात दोन वेळा येणारे हे व्रत, अमावस्येपूर्वी व पौर्णिमेपूर्वी येते. या व्रताचे पालन केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांना अपार आशीर्वाद देतात. प्रदोष व्रतादिवशी शिवमंदिरात … Read more

शिकाऊ विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी, ‘हे’ पार्ट टाइम जॉब्स दिवसाला देतील 6000 पेक्षाही अधिक कमाई 

Part-Time Jobs | अनेक जण शिक्षणासोबतच स्वतःच्या खर्चासाठी किंवा अनुभवासाठी पार्ट टाईम नोकरी शोधत असतात. विशेषतः परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकता शिकता कमावण्याची गरज असतेच. अमेरिकेसारख्या देशात विद्यार्थी व्हिसावर आठवड्याला 20 तास काम करण्याची मुभा असते. अशा वेळी योग्य नोकरी निवडणे गरजेचे ठरते. काही जॉब्स हे केवळ कमाईसाठीच नाही, तर ज्ञान, कौशल्य आणि बायोडेटामध्ये मूल्यवर्धन करणारे … Read more

व्हॅटिकन नव्हे, ‘हा’ आहे जगातील सर्वात छोटा देश; जिथं राजा आणि राणी चालवतात सरकार

Sealand | जगात विविध देश आपल्या आकार, संस्कृती आणि लोकसंख्येनुसार प्रसिद्ध आहेत. काही देश लोकसंख्येच्या घनतेसाठी ओळखले जातात, तर काही आपल्या विशालतेसाठी. पण तुम्हाला हे माहिती आहे का की जगात असा एक देश आहे जिथे केवळ 27 लोक राहतात? हो, हे खरं आहे! या देशाचं नाव आहे प्रिन्सिपॅलिटी ऑफ सीलँड (Principality of Sealand), आणि तो … Read more

“लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण, पण…”; कृषीमंत्री कोकाटेंचं मोठं वक्तव्य

Ladki Bahin Scheme | राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून तिच्यावरून राजकारण तापायला लागलं असतानाच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार दौऱ्यात मोठं विधान केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आहे, मात्र यामुळे इतर योजना बंद होतील असं अजिबात नाही. काय म्हणाले कोकाटे? नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे … Read more

मुंबई-पुणे एक्स्प्रेवर नियम मोडणे एसटी चालकांना पडणार महागात, आता चालकांच्या वेतनातून होणार दंड वसुली

मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील वाहतुकीचा कणा मानला जातो. मात्र, या मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसगाड्यांवर दररोज दंड आकारला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा दंड आता चालकांच्या वेतनातून वसूल करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे … Read more

MPSC लिपिक-टंकलेखक परीक्षाबाबत आयोगाचा अत्यंत महत्वाचा निर्णय!

MPSC Clerk-Typist Selection : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2023 अंतर्गत लिपिक-टंकलेखक पदांसाठी उमेदवारांना पसंतीक्रम सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी 21 फेब्रुवारी 2025 रोजी आयोगाने उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकरणासाठी पसंतीक्रम मागविले होते. मात्र, अनेक उमेदवारांनी अद्याप पसंतीक्रम सादर केलेला नसल्याचे लक्षात आल्याने आयोगाने शेवटची संधी दिली आहे. पसंतीक्रम सादर करण्यास मुदत … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील तरुणाची कमाल ! सायकलवरून पूर्ण केला आयोध्या-प्रयागराज-काशी विश्वनाथ असा १५५० किमी प्रवास, तेही १४ दिवसांत

एखादी गोष्ट मनावर घेतली तर काहीही अशक्य नाही. याचा प्रत्यय सचिन कुटे या तरुणाने पुन्हा आणून दिलाय. या तरुणाने १४ दिवसांत तब्बल १५५० किमी प्रवास चक्क सायकलने केला आहे. आयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ते भामाठाण असा १५५० कि.मी. प्रवास सायकल वर त्यांनी पूर्ण केला. त्यांचा या अनोख्या प्रवासाचे त्यांच्या नातेवाईक, मित्र परिवाराकडून कौतुक होत आहे. भामाठामचे … Read more