अहिल्यानगरच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच अरूणकाका यांना खरी श्रद्धांजली ठरेल- उपमुख्यमंत्री अजित पवार

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहराचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांचे शहराच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शुक्रवारी (दि. २ मे २०२५) अरुणकाका यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पवार रविवारी (दि. ४ मे २०२५) सकाळी जगताप यांच्या निवासस्थानी … Read more

अहिल्यानगरमधील कावीळ रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालकमंत्र्यांनी दिली तातडीने भेट, अधिकाऱ्यांना खडसावत तलाठी, ग्रामसेवकांना मुख्यालय न सोडण्याचे दिले आदेश

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील राजूर (ता. अकोले) येथे कावीळ या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णसंख्या २६३ वर पोहोचली आहे. या गंभीर परिस्थितीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी (ता. ४ मे २०२५) राजूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या आणि या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरणाऱ्या दोषींवर … Read more

चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीसाठी खास जर्मन मंडप, ३५०० खुर्च्या, खास नगरी भोजनासह मंत्र्यासाठी असणार AC रूम

Ahilyanagar News: अहिल्यानगर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चोंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे उद्या, मंगळवारी (दि. ६ मे २०२५) मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२:३० वाजता या बैठकीला सुरुवात होईल. सुमारे दीड तास चालणाऱ्या या बैठकीसाठी चोंडीत ‘जर्मन हँगर’ प्रकारचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने … Read more

शेतकऱ्याला वेठीस धरलं तर सोडणार नाही! जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील भंडारदरा धरण प्रकल्पांतर्गत प्रवरा उजव्या आणि डाव्या कालव्यांचे नूतनीकरण सुरू झाले आहे. या कालव्यांमुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा सुलभ होणार असून, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ जलसंपदा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत दाढ बुद्रुक आणि आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथे झाला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पाणीपुरवठा खंडित करणाऱ्या … Read more

निळवंडेच्या पाण्यावरून संगमनेरमध्ये वातावरण चिघळलं ! शेतकरी-अधिकारी आमनेसामने, राज्य राखीव दलाला पाचारण

संगमनेर तालुक्यामध्ये निळवंडेच्या पाण्यावरून रणकंदन पेटले आहे. पोलिसांनी पहिले आम्हाला गोळ्या घाला, मग पाणी कुठे घेऊन जायचे तिकडे घेऊन जा, अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. निमगाव बुद्रुक येथे शेतकऱ्यांचा मोठा जमाव जमा झाला होता. राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील येथे आल्या आहेत. निळवंडे उजवा कालव्याचे उप विभागीय अभियंता प्रमोद माने यांच्यासह विविध अधिकारीही … Read more

महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका लवकरच ! ह्या महिन्यात होईल निवडणूक

Elections In Maharashtra : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडल्या आहेत. यामध्ये मुंबई महानगरपालिका (BMC) आणि राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांचा समावेश आहे. या निवडणुकांचा मुहूर्त ६ मे २०२५ रोजी निघण्याची शक्यता आहे, कारण सर्वोच्च न्यायालयात या निवडणुकांशी संबंधित याचिकांवर त्या दिवशी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर निवडणूक तयारीला … Read more

गटबाजी न थांबल्यास राष्ट्रवादी काँग्रेस संपेल ! आमदार काशिनाथ दाते असे काय बोलले…

पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणावर गटबाजी असून, ही गटबाजी थांबली नाही तर माझ्यानंतर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपुष्टात येईल, असा इशारा आ. काशिनाथ दाते यांनी दिला. पक्षांतर्गत गटबाजी मोडून काढावी, असे साकडे पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांना आ. दाते यांनी घातले. माझ्याविरोधात वरिष्ठ नेत्यांचे कान भरण्यात येतात, चुगल्या … Read more

Ahilyanagar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अहिल्यानगर जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी सज्ज

अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षांमध्ये तरुण पिढीला काम करण्याची अधिक संधी आहे. मात्र राजकारणापासून लोक लांब जात आहेत. आगामी काळात जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय बैठका आयोजित करून तरुणांना पक्षासोबत जोडण्याचे आपण काम करून पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून आढावा बैठक घेऊन पक्षाची ताकद वाढवणार व पक्षामध्ये आपापसातील … Read more

सभापती राम शिंदेकडून जेवण ! पुरणपोळी ते ठेच्यापर्यंत २५हून अधिक पारंपरिक पदार्थांची मेजवानी!

Chondi Cabinet Meeting : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पहिल्यादांच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक चौंडी येथे होत आहे. त्यासाठी दीड एकरांवर मंडप उभारणी केली जात आहे. पाच हेलिपॅड उभारण्यात आले असून, गावातील सर्व रस्ते दुरूस्त केले जात आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ३६ मंत्री, सहा राज्यमंत्री, विविध विभागाचे सचिव, तसेच प्रशासकीय अधिकारी, पोलिस … Read more

धनंजय मुंडेंकडून Artificial Intelligence च्या मदतीने छळ ! नव्या आरोपाने खळबळ

मुंबईतील वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडून सातत्याने धमक्या मिळत असून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून बनावट व्हिडीओ आणि छायाचित्रे पाठवून आपला मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. या … Read more

संगमनेर तालुक्याच्या संरक्षणाचे आमदारकीचे कवच जनतेने घालविले : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर : एकही दिवस विश्रांती न घेता सातत्याने चाळीस वर्ष काम केले. दुष्काळग्रस्तांसाठी धरण व कालवे पूर्ण केले. आपला तालुका, विविध सहकारी संस्था यांना आमदारकीचे संरक्षणाचे कवच होते. जाती धर्माच्या नावाखाली खोट्या भुलथापांमुळे हे कवच जनतेने घालवले असून तालुक्याचे हक्काचे पाणी मिळवण्याबरोबर तालुका जपण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी … Read more

अजित पवारांनी आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाला शरद पवारांनी फिरवली पाठ! राजकीय चर्चांना उधाण

मुंबई- आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (अजित पवार गट) आयोजित माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळ्याची जोरदार चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत असून, यात महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव केला जाणार आहे. मात्र, या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार उपस्थित राहणार नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. … Read more

सभापती राम शिंदे यांच्या चौडी गावात एकाही घरकुलाची नोंद नाही, जामखेडमध्ये २५ गावांमध्ये घरकुल योजनेचा उडाला बोजवारा, योजनेपासून लोक वंचित

Ahilyanagar News: जामखेड- तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल सर्वेक्षणाकडे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केल्याने तब्बल २५ गावांमध्ये एकही ऑनलाइन नोंदणी झाली नाही, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी गावातही एकाही घरकुलाची नोंद नाही. यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पर्दाफाश झाला असून, अनेक गरीब कुटुंबे या योजनेपासून … Read more

प्रवरा कारखान्यावर व्यक्तिद्वेषातून आरोप, विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ- डॉ. सुजय विखे-पाटील

Ahilyanagar Politics: लोणी- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर याच्या प्रगतीत कामगारांचे मोलाचे योगदान आहे. नव्या हंगामात कारखान्याचे नूतनीकरण पूर्ण होईल, ज्यामुळे गाळप क्षमता वाढेल आणि कामगार, सभासद यांच्यासाठी चांगले निर्णय घेतले जातील. मात्र, केवळ वैयक्तिक द्वेषापोटी कारखान्यावर खोटे आरोप केले जात आहेत. जे आरोप करतात, त्यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी काय योगदान दिले, … Read more

पिण्याचे पाणी, फळबागांसाठी कुकडीचे आवर्तन सोडा खासदार नीलेश लंके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सध्या तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असून, सर्वच ठिकाणच्या पाण्याचे उगम आटून गेले आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी, शेतीसाठीचे व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर कुकडी प्रकल्पातून आवर्तन सोडण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील … Read more

अखेर राम शिंदेंनी विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाचा बदला घेतला! रोहिणी घुले यांची कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

Ahilyanagar Politics: कर्जत- नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार रोहित पवार गटाच्या प्रतिभा भैलुमे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवड निश्चित झाली. या विजयामुळे प्रा. राम शिंदे गटाने कर्जत नगरपंचायतीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. शुक्रवारी (२ … Read more

राज्यातील जलसंपदा प्रकल्पास केंद्रशासन मदत करणार – केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५’ च्या समारोप

शिर्डी :- पुढील चार वर्षांत देशातील प्रत्येक गावात व शेतास पाणी देण्याचा संकल्प घेऊन केंद्र शासन काम करित असून राज्यात प्रस्तावित सुमारे एक लाख कोटींच्या जलसंपदा प्रकल्पास केंद्र शासन निश्चितपणे सर्वातोपरी मदत करेल, अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी दिली. लोणी येथे जलसंपदा विभागाच्यावतीने आयोजित ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५’ च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. … Read more

पंतप्रधान मोदींच्या प्रयत्‍नांमुळे पुढील चार वर्षात या देशातील दुष्‍काळ संपुष्‍टात !

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्‍या प्रयत्‍नांमुळे पुढील चार वर्षात या देशातील दुष्‍काळ संपुष्‍टात आलेला असेल. कारण पाण्‍याच्‍या योजनांसाठी मोदींनी जेवढा निधी दिला तेवढा यापुर्वी कोणीही दिला नव्‍हता. संपूर्ण देशात जलसिंचनाच्‍या योजनांची मोठी कामे सुरु आहेत. प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पुर्ण करुन दुष्‍काळ संपुष्‍टात आणण्‍यासाठी सर्वांना एकत्रिपणे काम करावे लागेल, राज्‍यातील योजनांसाठी शक्‍य तेवढा निधी उपलब्‍ध करुन देण्‍याची … Read more