राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या राजकीय वादात करोडोच्या उद्यान प्रकल्पाची झाली दुर्दशा; झाडे जळाली, कोनशिलाही गायब

Ahilyanagar News: कर्जत- शहरातील समर्थ गार्डन, जे एकेकाळी हिरवळीने नटलेलं आणि शहरवासीयांचं आकर्षण होतं, आज मात्र ओसाड आणि उद्ध्वस्त अवस्थेत आहे. झाडं कोरडी पडली, गवत पिवळं झालं, करंज्यांवर धूळ साचली आणि कचऱ्याचे ढीग लागलेत. पाण्याच्या नियोजनाअभावी आणि देखभालीच्या कमतरतेमुळे हे गार्डन आज केवळ सांगाड्याच्या स्वरूपात उभं आहे. स्थानिकांच्या मते, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे … Read more

कोपरगावला पाणी टंचाईची झळ, गावतळे आणि शेततळे भरून देण्याची आमदार आशुतोष काळे यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

Ahilyanagar News: कोपरगाव- तालुक्यातील पूर्व भागात सध्या तीव्र पाणी टंचाईने नागरिक आणि शेतकरी हैराण झाले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी अहिल्यानगर येथे ११ मे २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. त्यांनी नांदूर मध्यमेश्वर जलद कालवा आणि पालखेड कालव्यातून गावतळे आणि शेततळे भरून देण्याची मागणी केली, जेणेकरून पावसाळ्यापर्यंत … Read more

कर्जत नगरपंचायतीचा वाद पुन्हा उच्च न्यायालयात, आमदार रोहित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला तिसऱ्यांदा दिले आव्हान!

Ahilyanagar News कर्जत- नगरपंचायतीच्या गटनेतेपदाच्या निवडीचा वाद पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पोहोचला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ९ मे रोजी घेतलेल्या सुनावणीत संतोष मेहेत्रे यांचेच गटनेतेपद कायम ठेवण्याचा निर्णय दिला. हा निर्णय आमदार रोहित पवार यांच्या गटाला मान्य नसल्याने त्यांनी १३ मे रोजी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान दिले. … Read more

धरणातील गाळ काढण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण करा- विखे पाटील

धरणातील गाळ काढण्यासाठी अन्य राज्यांनी केलेले धोरण व महाराष्ट्र राज्याचे या बाबतचे असलेले धोरण याचा तुलनात्मक अभ्यास करून राज्याचे सर्व समावेशक असे नवीन धोरण तयार करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार्या मोहीमेत सहा प्रकल्पांत जिल्ह्यातील मुळा धरणाचा समावेश करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात … Read more

देवस्थान जमिनीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! जमिनींच्या खरेदी-विक्रीवर घातली बंदी, अध्यादेश काढण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्रातील देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवारी (१३ मे २०२५) मंत्रालयात झालेल्या बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी विभागाला याबाबत कठोर आदेश दिले. या निर्णयानुसार, शासन धोरण ठरेपर्यंत देवस्थानच्या जमिनींचे सर्व व्यवहार थांबवण्यात येणार असून, तातडीने यासंदर्भात अध्यादेश जारी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या … Read more

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात तर उपाध्यक्षपदी पांडुरंग घुले यांची बिनविरोध निवड

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी (दि. १३ मे २०२५) कारखान्याच्या अतिथीगृहात प्रादेशिक सहसंचालक संतोष बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार … Read more

कर्जत नगरपंचायतीत रोहित पवारांना मोठा धक्का, गटनेता बदलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा फेटाळली

Ahilyanagar Politics: कर्जत- नगरपंचायतीच्या सत्तासंघर्षात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. गटनेता बदलण्यासाठी रोहित पवार गटाने केलेली मागणी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दुसऱ्यांदा फेटाळली आहे. गटनेतेपदी संतोष म्हेत्रे आणि उपनेतेपदी सतीश पाटील यांची नेमणूक कायम ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळे रोहित पवार गटाची नगरपंचायतीतील सत्ता … Read more

अहिल्यानगरमधील ठाकरे गटाचा ‘हा’ बडा नेता पक्षाला देणार सोडचिठ्ठी, लवकरच सत्ताधारी पक्षात करणार प्रवेश?

Ahilyanagar Politics: श्रीगोंदा- तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख नेते राजेंद्र नागवडे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली पुढील राजकीय वाटचाल ठरवण्यासाठी लवकरच निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सोमवारी (१२ मे २०२५) आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात … Read more

निवडणूक जवळ आलीय, प्रभागात काम करण्यासाठी निधी द्या, भाजप नगरसेवकांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी!

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- शहरातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. चार महिन्यांनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी प्रभागातील विकासकामांसाठी निधीची मागणी या भेटीत करण्यात आली. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांनी शहरातील प्रलंबित नागरी समस्यांवर चर्चा … Read more

अहिल्यानगरमध्ये आगामी निवडणुकांसाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांची जोरदार तयारी, जिल्ह्यातील १२ नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील १२ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२५ पूर्वी या निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिल्याने आता या निवडणुकांना गती मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुका २५९ ते २८७ नगरसेवकांच्या जागांसाठी होऊ शकतात, परंतु जुन्या की नव्या सदस्यसंख्येनुसार निवडणुका होतील, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. राजकीय पक्ष आणि … Read more

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाला जलसंपदा विभागाने दाखवली केराची टोेपली, अतिक्रमण मोहिम थंडावली

Ahilyanagar News: श्रीरामपूर- शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम आणि प्रवरा कालव्यासह चाऱ्यांवरील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चार महिन्यांपूर्वी नगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली होती, पण ती काही दिवसांनंतर थंडावली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रवरा कालवा आणि चाऱ्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते, परंतु जलसंपदा विभागाने या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. … Read more

जादा दराने खतांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, आमदार मोनिका राजळे यांच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषी अधिकाऱ्यांना सूचना

Ahilyanagar News: शेवगाव- तालुक्यात २०२५-२६ खरीप हंगामाच्या तयारीसाठी योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याचे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी, तसेच खतांचा काळाबाजार, साठेबाजी आणि अनावश्यक लिंकिंगवर कडक नियंत्रण ठेवावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. शेवगाव तहसील कार्यालयात राजळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या … Read more

सरकारकडून पाठबळ मिळत नसल्यामुळे अहिल्यानगरमधील साखर कारखाने तोट्यात, माजी आमदार मुरकुटे याचे मत

Ahilyanagar News:श्रीरामपूर- भारतातील साखर उद्योग सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून पुरेसे पाठबळ न मिळणे, साखरेच्या उत्पादन खर्चात वाढ आणि शेतकऱ्यांना द्यावी लागणारी किमान आधारभूत किंमत (FRP) यामुळे साखर कारखान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. साखरेला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने बहुतांश कारखाने तोट्यात गेले आहेत. अशा परिस्थितीत … Read more

खासदार नीलेश लंके यांची ग्रामीण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड! साहित्यिक, कवी आणि मान्यवरांची असणार खास उपस्थिती

Ahilyanagar News: अहिल्यानगर- निमगाव वाघा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १४ मे २०२५ रोजी आयोजित होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार नीलेश लंके यांची निवड झाली आहे. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्रीनवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचे संयोजक नाना डोंगरे यांनी … Read more

बाळासाहेब विखे पाटलांचा थक्क करणारा प्रवास ! ‘देह वेचावा कारणी’ या आत्‍मचरित्राच्‍या दुस-या आवृत्‍तीच्‍या निमित्‍ताने….

माझे वडील लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) १९६२ पासून अखेरपर्यंत सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष या पदावर नऊ वर्षे राहिल्यानंतर १९७१ ते २००९ या संपूर्ण काळात ते संसदीय राजकारणातच सक्रिय होते. त्यांचे राजकारण-समाजकारणाचे प्रमुख कार्यक्षेत्रही तेच राहिले. माझे आजोबा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे जीवन आणि कार्य; तर दुसऱ्या बाजूला संसदेत होणाऱ्या … Read more

शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा कोणी प्रयत्न केला तर ते आम्ही सहन करणार नाही- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar News : संगमनेर- शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी जुन्या ब्रिटिशकालीन सिंचन योजनांना सक्षम करण्याचे धोरण जलसंपदा विभागाने स्वीकारले आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. मात्र, ज्यांना जनतेने नाकारले, असे काही नेते स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पाण्याच्या मुद्यावर राजकारण करत असल्याचा आरोप पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. … Read more

निळवंडेच्या पाण्यावरून शेतकऱ्यांना भडकावून थोरातांचे राजकारण, आमदार अमोल खताळ यांचा नाव न घेता आरोप

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यात निळवंडे कालव्याच्या पाण्याच्या वितरणावरून राजकारण तापले आहे. आमदार अमोल खताळ यांनी काही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते निळवंडे पाण्याचा मुद्दा पुढे करून शेतकऱ्यांमध्ये दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. हे नेते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि स्वतःची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला. संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना … Read more

पुण्यातील राजकारण पुन्हा पेटलं; ‘त्या’ दोन महिला नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

शासन बीडीपी म्हणजे बायोडायव्हर्सिटी पार्क आरक्षण रद्द करतंय, असा आरोप पुण्याच्या माजी खा. वंदना चव्हाण यांनी केल्यानंतर पुण्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय. टेकड्यांची व हिरव्यागारा निसर्गाचं शहर म्हणून पुण्याची ओळख आता पुसतेय, असा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केला आहे. पुण्यात आरक्षित असलेल्या बीडीपी जागांवर अतिक्रमणे होत असून पुणे बकाल होत असल्याची टिका आता सुरु झाली आहे. … Read more