पुन्हा रंगणार आयपीएलचा थरार…उर्वरित सामने कधी होणार? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील इंडियन प्रीमियर लीग या क्रिकेट मॅचचे 31 सामने स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. याच सीझनचे उर्वरित सामने याच वर्षी होणार असल्याचं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं होतं. अखेर आज आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आयपीएलच्या १४ व्या पर्वातील उर्वरित सामने यूएईमध्ये … Read more

आयपीएलमध्ये खेळल्याचे पैसेच मिळाले नाहीत !

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्ये खेळल्याचे पैसे 10 वर्ष झाले तरी मिळाले नसल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने केला आहे. हॉगला 2010च्या आयपीएल लिलावात कोच्ची संघाने 4,52,000 अमेरिकन डॉलरला संघात घेतले होते. हॉगने ट्विटमध्ये म्हटले आहे की, खेळाडूंना अद्याप फक्त 35 टक्के पैसे मिळाले आहेत, … Read more

गुड न्यूज : ह्या कालावधीत सुरु होणार आयपीएल !

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयपीएल सामने रद्द करण्यात आले होते. स्थगित झालेले सामने दुबई येथे घेण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या 25 दिवसांच्या कालावधीत 31 सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. आयपीएलचा 14वा सीझन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयपीएल रद्द झाल्यामुळे नाराज … Read more

आयपीएलमधील या संघाकडून कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी 45 कोटींचा हातभार!

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून या विषाणूशी संपूर्ण देश लढू राहिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या नागरिकांना मदत करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स देण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयकडून 10 लीटरचे 2000 कॉन्सेट्रेटर्स प्रदान केले जातील. हे कॉन्सेट्रेटर्स येत्या काही महिन्यांत संपूर्ण भारतात वितरित केले जातील. बीसीसीआयचा … Read more

आयपीएलचा थरार पुन्हा… या देशात खेळवले जाणार सामने

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- देशभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आयपीएलमध्येही शिरकाव केला. तसेच अनेक संघातील खेळाडू तसेच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आयपीएलच्या 14व्या पर्वाला स्थगिती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. पण आता हे सामने परत एकदा होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. बीसीसीआयला काहीही करून 14 वे पर्व संपवायचे आहे. … Read more

विराट कोहलीवर दु:खाच सावट ! जवळच्या व्यक्तीची निधन…

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  विराट कोहलीसाठी दु:खद बातमी आहे. सध्या कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. या सामन्यापूर्वी कोहलीनं आपल्या जवळची खास व्यक्ती गमवली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे बालपणीचे कोच सुरेश बत्रा यांचं निधन झालं आहे. विराटला लहान असताना त्याला क्रिकेटचे धडे देणारे प्रशिक्षक सुरेश बत्रा यांचं … Read more

प्रेरणादायी ! नोकरी सोडली अन गावाकडे येऊन सुरु केला ‘हा’ व्यवसाय ; आता कमावतोय लाखो रुपये , तुम्हीही करू शकता

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- पाटणा व त्या आसपास परिसरातील शेतकरी सहसा मका, डाळ, कडधान्य, धान्य आणि तांदूळ पिकवतात. परंतु तेथील एका 28 वर्षीय व्यक्तीने वेगळ्या दिशेने जाण्याचे ठरविले. चंपारण जिल्ह्यातील मुरारे गावचे नितिल भारद्वाज मोत्याच्या शेती पासून लाखो रुपये कमवत आहेत. नितील हा पारंपारिक शेतकरी कुटुंबातील आहे, परंतु तो दिल्लीतील एका बहुराष्ट्रीय … Read more

आयपीएलच्या या मराठमोळ्या खेळाडूची कोविड सेंटरसाठी मदत

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-आयपीएलमध्ये खेळणाऱ्या पुण्याच्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने लोणीव्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ कोविड सेंटरसाठी 1 लाखाची मदत करण्याची घोषणा केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बाळासाहेब नाहाटा यांनी लोणी व्यंकनाथ येथे कोविड सेंटर सुरु केले आहे. त्यावर ऋतुराज गायकवाडने पुण्यातील एका मित्राच्या मार्फत नाहाटांशी संपर्क साधला. व ग्रामीण भागातील कोविड … Read more

ऑक्सिजन’साठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली इतक्या कोटींची मदत !

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि मागील ७-८ दिवसांपासून दररोज साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही कोलमडलेली पाहायला मिळत आहे. अशात अनेक दिग्गज मंडळींनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ऑक्सिजनसाठी ‘Mission Oxygen’ ही मोहीम सुरू झाली आहे आणि त्याच्या माध्यमातून देशांतील अनेक हॉस्पिटल्सना देणगी … Read more

विदेशी खेळाडू आले भारताच्या मदतीसाठी ; आर्थिक मदतीचा ओघ सुरु

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-भारतातील करोनाची स्थिती अत्यंत भयंकर होत चालली आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पॅट कमिन्सने या संकटावर मात करण्यासाठी ३७ लाखांची मदत केली. कमिन्सनंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीने ४२ लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. ब्रेट लीने आपल्या ट्विटरवर पोस्ट शेअर करताना लिहिले, की माझ्यासाठी भारत नेहमीच दुसऱ्या घरासारखा आहे. … Read more

झहीर खान लाज वाटते तुला श्रीरामपूरकर म्हणण्याची!

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन मुनाफ पटेलपासून सुंदर पिचाई यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांनी आपल्या जन्मभूमीबद्दल कणव दाखवत मदतीचा हात दिला. मात्र, श्रीरामपूर जन्मभूमी असलेल्या भारतीय संघाचा निवृत्त क्रिकेटपटू झहीर खान याने सातत्याने दुर्लक्ष केल्याने ‘लाज वाटते तुला श्रीरामपूरकर म्हणण्याची!’ अशा शब्दात त्याच्यावर टीकेची झोड … Read more

‘या’ क्रिकेटपटूने पुण्यात सुरू केली मोबाइल कोरोना चाचणी प्रयोगशाळा

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- आम्ही या कठीण काळात इतरांना मदत करून फक्त एक छोटेसे कार्य करत आहोत. पुण्यात मोबाइल कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू केली आहे. ही प्रयोगशाळा शनिवारपासून सुरू झाली, अशी माहिती भारतीय क्रिकेट संघाचा ऑफस्पिनर आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या हरभजनसिंग याने ट्विट करून दिली. ट्विटमध्ये हरभजनने म्हटले आहे … Read more

आयपीएल : मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु यांच्यात आज रंगणार सलामीचा सामना

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-जगातील सर्वात लोकप्रिय आयपीएल टी-२० लीगच्या १४ व्या हंगामाला शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. सलामीचा सामना पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. मुंबईचे नेतृत्व रोहित शर्मा तर बेंगळुरूचे नेतृत्व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली करत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा युएईमध्ये झाली होती. … Read more

धोनी पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- कोरोना कालावधीमधील लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद ठेवण्यात आले होते. त्यातच, पुढील सामन्यांसदर्भात निश्चिती नसल्याने धोनीने आपली निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, धोनीसारख्या महान क्रिकेटपटूने अशी ट्विटरवरुन निवृत्ती जाहीर करणे चाहत्यांना आवडले नाही. त्यामुळे, धोनीच्या निवृत्तीसाठी बीसीसीआयने एक सामना घ्यावा, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांनी केली होती. अखेर, बीसीसीआयने … Read more

निर्णायक सामना : इंग्लंडला विजयासाठी ३३० धावांचं आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- भारत आणि इंग्लड संघात आज वनडे मालिकेचा तिसरा व अखेरचा सामना खेळला जात आहे. एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक लढतीत भारतीय संघानं इंग्लंडसमोर विजयासाठी ३३० धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीने शतकी भागिदारी केल्याने भारतीय संघाची स्थिती मजबूत झाली. … Read more

बापरे…दुर्बिणीने निरीक्षण करून क्रिकेटवर सट्टा, ३३ जण जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-  एमसीएच्या गहुंजे येथील ( पुणे) स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय दुसरा सामना सुरू होता. त्यावेळी बेटिंग सुरू होते. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे येथे सुरू असलेल्या क्रिकेट सामन्याचे आरोपी दुर्बिणीने निरीक्षण करीत होते. त्यामुळे प्रत्येक बॉलचा खेळ त्यांना थेट पाहता येत होता. … Read more

सचिन तेंडुलकरलाही झाली कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती खुद्द सचिनने ट्विट करत दिली आहे. “मला कोरोनाची बाधा झाली आहे. मी सर्व काळजी घेत आहे. माझी आज चाचणी झाली व त्यात माझे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. माझ्या घरच्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. मी घरातच स्वत:ला … Read more

Maharashtra Budget 2021 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज देण्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे.  तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. कृषी … Read more