दीपक पुनिया उपांत्य फेरीत: ऑलिम्पिकसाठी पात्र

नूर सुलतान : उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या कार्लोस आर्तुरो मेंडेझचा अटीतटीच्या लढतीत ७-६ असा निसटता विजय मिळवून ज्युनियर विश्वविजेता दीपक पुनियाने विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ८६ किलो गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयासह दीपक पुनियाने पुढील वर्षी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमधील आपले स्थानही निश्चित केले. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा दीपक पुनिया हा चौथा भारतीय कुस्तीपटू आहे. … Read more

धोनीच्या यशस्वी नेतृत्वाचे बारा वर्षे पूर्ण

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी भारताचाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. माजी कर्णधाराच्याच नेतृत्वाखाली भारताने आयसीसीच्या पहिल्या ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पाठोपाठ आयसीसी चॅम्पियन्स करंडकही पटकावला. २०११ साली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उत्तुंग षटकार ठोकून धोनीने भारताला आयसीसी एकदिवसीय विश्वचषक मिळवून दिला. आयसीसीचे तिन्ही करंडक जिंकणारा महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेट जगतातील एकमेव … Read more

खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून क्रीडा मंत्र्यांशी बोलणार -पालकमंत्री राम शिंदे

अहमदनगर – शालेय क्रीडा स्पर्धेवर क्रीडा शिक्षक व क्रीडा संघटनांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या मनमानी कारभाराला व हुकूमशाहीला विरोध करून टाकलेल्या बहिष्काराच्या संदर्भात योग्य ती कार्यवाही व्हावी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राम शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पालकंत्री शिंदे यांनी कुठल्याही खेळाडूचे नुकसान होऊ देणार नाही. यासंदर्भात आजच तातडीने शिक्षण मंत्र्यांशी बोलून … Read more

नगरच्या झोपडपट्टीत राहणारी शुभांगी करणार जागतिक फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व

अहमदनगर :- शहरातील संजयनगर  झोपडपट्टीत राहणारी कुमारी शुभांगी राजू भंडारे इंग्लंडमध्ये आयोजण्यात आलेल्या जागतिक वंचित फुटबॉल स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. तिचे वडील वडापाव विकतात तर आई हॉटेलमध्ये चपात्या लाटते. सर्व प्रकारच्या असुविधा आणि गरिबीवर मात करीत शुभांगीने हे यश मिळवले. आपण  समाधानी नसून भारताच्या फुटबॉल संघात प्रवेश मिळविण्याचे आपले पुढील दोन वर्षातील ध्येय असल्याचे शुभांगीने … Read more