अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- दक्षिण आफ्रिका अथवा इतर जोखमीच्या देशातून महाराष्ट्रात आलेले ६ प्रवासी कोविडबाधित आढळलेले आहेत.
कल्याण-डोंबिवली, मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर मनपा आणि पुणे या भागात आलेला प्रत्येकी एक प्रवासी कोविड बाधित आढळला असून या प्रवाशांचे प्रयोगशाळा नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आले आहेत,
अशी माहिती आरोग्य विभागाने मंगळवारी (ता.३०) दिली. दरम्यान, ओमायक्राॅन विषाणूच्या धास्तीने मुंबई, पुणे येथील पहिली ते सातवी शाळा आता १५ डिसेंबरपर्यंत तर औरंगाबाद,नाशिक येथील शाळा १० डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत.
राज्यात मंगळवारी ६७८ काेरोना रुग्ण आढळले. ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजमितीस ७ हजार ५५५ कोरोना रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
मुंबईत मंगळवारी १८७ कोराेनाचे नवे रुग्ण आढळले, तर दोघा रुग्णांचा मृत्यू झाला. २९ हजार २२३ आरटीपीसीआर कोराेना चाचण्या करण्यात आल्या. तर कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ६९४ नातेवाइकांचा शोध घेण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम