अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- कोरोनाला थोपवण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसाख्या देशामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच पार्शवभूमीवर बलाढ्य देश अमेरिका मधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
अमेरिकेत फायझर लसीच्या तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर आजपासून नागरिकांना ही लस मिळण्यास सुरुवात होणार आहे. कोरोना लसीच्या पुरवठ्याचं काम पाहत असलेल्या गुस्ताव पर्ना यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
लसीच्या 30 लाख डोसेजची पहिली खेप या आठवड्याच्या अखेरपर्यंत सगळ्या राज्यांना पाठवण्यात येणार असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे. फायझर कंपनीची कोरोना व्हायरसवरची लस 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येत आहे.
यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अमेरिकेच्या अन्न, औषध प्रशासन विभागाने ही लस सुरक्षित असल्याचं मान्य केलं आहे.
अमेरिकामध्ये सतत वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या घटना रोखण्यासाठी लसीचा तातडीने वापराला परवानगी देण्यात आली. त्यामुळे आता लस मंजूर झाल्यानंतर, देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रित येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान जानेवारीच्या अखेरपर्यंत भारतातही लसीकरणास सुरुवात होऊ शकते. तसे संकेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com