तुम्हाला झालेली सर्दी ही ओमायक्रॉनच लक्षणं असू शकते…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  कोरोना व्हायरसचा संसर्ग भारतात वाढताना दिसतोय. यातच गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणंही वाढलेली आहे अशी आकडेवारी सांगत आहे.

ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत त्यांनाही या व्हेरिएंटची लागण होतेय. अभ्यासात असं दिसून आलंय की, लसीचा एक डोस किंवा पूर्ण लसीकरण केलेल्या व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो.

परंतु जर कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तीला संसर्ग झाला असेल तर त्या व्यक्तीला लक्षणं दिसत नाहीत किंवा फार सौम्य लक्षणं दिसून येतात.

डॉक्टरांच्या माहितीनुसार ओमायक्रॉनची लागण झालेल्या बहुतेक रुग्णांमध्ये सर्दीसारखी लक्षणं दिसतात. आणि ते स्वतःच बरे देखील होतात.

त्याचप्रमाणे घसा खवखवणे याशिवाय ओमिक्रॉनच्या इतर काही लक्षणांमध्ये थकवा, ताप, अंगदुखी, रात्री घाम येणं, शिंका येणं, नाक वाहणं, मळमळ तसंच भूक न लागणं या लक्षणांचाही समावेश आहे.

ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर घसा खवखवण्याचा त्रास होतो.

ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनी घसा खवखवण्याच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. असे डॉक्टर सांगत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe