देशात कोरोना पुन्हा हातपाय पसरतोय, ५८ हजार रुग्ण !

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra news : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासात देशात तब्बल १२ हजार २१३ नवे रुग्ण आढळले आहेत.

तर दिवसभरात ७ हजार ६२४ जण कोरोनामुक्त झाले. सद्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ५८ हजार २१५ इतकी आहे. पॉझिटिव्हीटी रेट हा २.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे.इकडे महाराष्टातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

राज्यात बुधवारी ४,०२४ नवीन करोनाबाधितांचे निदान झाले. दिवसभरात राज्यात दोन कोरोनारुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात सध्या १९,२६१ उपचाराधीन रुग्ण आहेत. पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए.५ उपप्रकाराचे आणखी चार रुग्ण आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी एक रुग्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे येथील आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe