अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- न्यूझीलंडमध्ये एका व्यक्तीला अवघ्या 24 तासांत 10 वेळा कोरोनाची लस मिळाली आहे. त्यानंतर आता आरोग्य मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.(corona vaccine)
असं मानलं जातं की, यासाठी त्या व्यक्तीने एका दिवसात अनेक लसीकरण केंद्रांना भेट दिली आणि प्रत्येक डोससाठी पैसे दिलेत.
न्यूझीलंडमधील आरोग्य मंत्रालयाच्या कोविड-19 लस आणि लसीकरण कार्यक्रमाचे ग्रुप मॅनेजर अॅस्ट्रिड कॉर्निफ म्हणाले, ‘मंत्रालयाला याची माहिती देण्यात आली आहे, आम्ही ही बाब अतिशय गांभीर्याने घेत आहोत.’
“आम्ही या परिस्थितीबद्दल खूप चिंतित आहोत आणि उपयुक्त एजन्सींसोबत काम करत आहोत,” असंही कॉर्निफ यांनी सांगितलं आहे.
जर तुम्हाला कोणी लसीचा ओव्हरडोज घेतला असेल तर त्यांनी शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही घटना कुठे घडली याची मंत्रालयाकडून पुष्टी केली जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय.
या प्रकरणाबाबत, लसीकरण सल्लागार केंद्राचे वैद्यकीय संचालक आणि ऑकलंड विद्यापीठाच्या प्रोफेसर निक्की टर्नर यांनी सांगितलं की, एका दिवसात इतक्या लसी घेण्याचा कोणताही डेटा नाहीये.
निक्की टर्नर म्हणाल्या, आम्ही वापरत असलेली लस प्राथमिक माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. ही माणसाच्या शरीरात चांगली रोगप्रतिकारक शक्ती देण्याचं आणि लोकांना सुरक्षित ठेवण्याचे काम करते. आम्हाला माहित आहे की लसीचे अनेक डोस घेण्याचे दुष्परिणाम जास्त आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम