कोरोनाने मृत्यू,आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना ५० हजारांची मदत ! या कागदपत्रांची असेल आवश्यकता ! अशा असतील नियम व अटी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- राज्यात कोविड-१९ संसर्गाने निधन झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकांना ५०,००० रुपयांचे सानुग्रह साहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार हा निर्णय घेतला असून त्याचा जीअारही जारी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी दिली.

महाराष्ट्र राज्यात कोविड-१९ या आजारामुळे निधन पावलेली व्यक्ती तसेच कोविड-१९ चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाइकांनाही ५०,००० रुपयांचे सानुग्रह साहाय्य देण्यात येणार आहे.

या कागदपत्रांची असेल आवश्यकता ! विशेष म्हणजे मृत्यू प्रमाणपत्रावर ‘कोरोनामुळे मृत्यू झाला’ अशी नोंद नसली तरी अटींची पूर्तता झाल्यास कुटुंबीयांना मदत मिळणार आहे.

मदतीसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाभार्थीच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे.

त्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. अशा असतील नियम व अटी कोरोनाचे निदान झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत किंवा नंतर मृत्यू झाला असला तरी तो कोरोनानेच मृत्यू झाला असे समजले जाईल.

आरटीपीसीआर वा ॲँटिजन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती, आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल व्यक्तींचे निधन झाले तरी त्या व्यक्तींचे कुटुंबीय लाभासाठी पात्र ठरतील.

मृत्यू रुग्णालयाबाहेर झाला वा त्या रुग्णाने आत्महत्या केली असेल तरी मदत मिळेल. कोविड-१९ मुळे मृत्यू अशी नोंद नसली तरीही अटींची पूर्तता होत असल्यास ती प्रकरणे अनुदानासाठी पात्र असतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe