अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-जगभर कोरोनाचा प्रभाव सातत्यानं वाढत आहे. त्याच्या संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. यामुळे संपूर्ण जगाचं कोरोनावरील प्रभावी लसीकडे लक्ष लागलं आहे.
जगभरातील अनेक देश कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनावरची लस कधी उपलब्ध होणार याची सामान्यांना उत्सुकता लागली आहे. अशातच अनेक लसींची चाचणी ही अंतिम टप्प्यात आहे. रशियाने मात्र सर्वात आधी कोरोनावरील प्रभावी लस ‘Sputnik V’ तयार केल्याचा दावा केला होता.
आता रशियाने लसीकरणालाही सुरुवात केली आहे. कोरोना लसीच्या लसीकरणात रशियाने आघाडी घेतली आहे. रशियामध्ये प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ‘Sputnik V’ या रशिया निर्मीत कोरोना लसीचा डोस रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये देण्यात येत आहे.
डॉक्टर, आरोग्यसेवक अशा हायरिस्क वर्गात मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य दिलं जात आहे. लसीकरणासाठी मॉस्कोमध्ये शनिवारी 70 लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. रशियामध्ये लसीकरण करताना ज्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे.
अशा लोकांना प्राधान्य दिलं जात आहे. Sputnik V लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, ही लस कोरोनावर 95 टक्के प्रभावी आहे. तसेच या लसीचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत. दरम्यान, सकारात्मक परिणामांनंतरही लसीचं सामूहिक परीक्षण अद्याप सुरु आहे.
हजारो लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. ही लस सर्वात आधी शाळेतील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आमि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात येईल. सर्व रुग्णांना 21 दिवसांच्या अंतराने लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved