अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक राष्ट्रे यावर लस शोधून काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जगभरातील जवळपास 100 पेक्षा जास्त औषध कंपन्या वॅक्सीन तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत.
आता अमेरिकेतील एका कंपनीची लस ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे तर चीनमधील कंपनीने आपली लस 99 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे.
चीनी कंपनी सिनोवॅक बायोटेकने कंपनीने तयार केलेल्या लसीचं जवळपास एक हजारपेक्षा जास्त लोकांवर ट्रायल सुरू आहे. आता या लसीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल ब्रिटनमध्ये केलं जाणार आहे.
शास्त्रज्ञांनी ही लस 99 टक्के प्रभावी ठरेल असा दावा केला आहे. कंपनी बीजिंगमध्ये एक प्लांट तयार करत आहे, जिथं जवळपास दहा कोटींपेक्षा जास्त डोस तयार केले जातील.
तर दुसरीकडे अमेरिकेतील मॉडर्ना इंक डॉट कंपनीने आपल्या लसीचं पहिलं ट्रायल यशस्वी झाल्याचं सांगितलं आहे. या लसीमुळे शरीरात अँटिबॉडीज तयार होत आहेत.
लसीचं ट्रायल वेगवेगळ्या स्तरावर होत आहे. सिएटलमध्ये 45 निरोगी व्यक्तींवर या लसीचं परीक्षण करण्यात आलं त्यावेळी त्यांना कमी मात्रेचे 2 शॉट्स देण्यात आले आणि त्यावेळी त्यांच्या शरीरात कोरोनाविरोधात लढणारी अँटिबॉडीज दिसून आल्या.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews