बाळाला कुशीत घेण्याआधीच त्या माऊलीने सोडले प्राण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :-जगभर कोरोनाचे संकट फोफावत आहे. या महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या दरम्यान एक अत्यंत काळजाला भेदणारी घटना घडली आहे. सोशल मीडियावर सध्या न्यूयॉर्कमधील एक हृदयद्रावक घटना व्हायरल होत आहे.

कोरोनामुळे एका आईला आपल्या बाळाला कुशीत न घेताच प्राण गमवावा लागला आहे. न्यूयॉर्कमधल्या वनेसा कार्डेनस गोंजाजेस नावाच्या महिलेनं 9 नोव्हेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला होता.

त्यानंतर 5 दिवसानंतर त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. कोरोना झाल्यामुळे वेनिसाला आणि बाळाला वेगळे ठेवण्यात आले होते.

कोरोनामुळे चिमुकलीला त्यांना कुशीतही घेता आले नाही. केवळ व्हिडीओ कॉलवर चेहरा पाहता आला. त्यानंतर मात्र वनेसाने प्राण सोडले.

वनेसाचा नवरा अल्फान्सन्सो आता आपल्या बाळाची काळजी घेत आहे. सगळ्यांना आशा होती की, वनेसा कोरोनासोबतची झुंज जिंकेल. पण कोरोनासमोर वनेसाने हात टेकले. तिचा यामध्ये मृत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe