लॉक डाऊनमुळे देशभरात सर्वत्र मजूर अडकले आहेत. त्यांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी केंद्राने विशेष रेल्वे सेवा सुरू केली. रेल्वेने प्रवास करताना कोरोनाचा फैलाव होऊ नये याबाबत काळजी घेतली जात आहे.
आज दिल्ली ते केएसआर बंगळुरु रेल्वेतून 543 प्रवासी बंगळुरुला पोहोचले. यानंतर बंगळुरु सरकारने त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन राहण्याची सूचना केली. यापैकी 140 जणांनी सुरवातीस क्वारंटाईनमध्ये राहण्यास नकार दिला.
त्यापैकी काहींना कर्नाटक सरकारने पुन्हा दिल्लीला पाठवून दिल. अधिक माहिती अशीi, दिल्ली ते केएसआर बंगळुरु रेल्वेतून 543 प्रवासी बंगळुरुला पोहोचले. यावेळी प्रवाशांना बंगळुरु स्थानकावर मोठा गोंधळ घातला.
यापैकी 140 लोकांनी NO Quarantine च्या घोषणा दिल्या. यावेळी कर्नाटक सरकारचे अधिकारी आणि पोलीस, रेल्वे अधिकारी याच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी प्रवाशांची समजूत काढण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी इस्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यापैकी अनेकांनी क्वारंटाईनमध्ये राहण्यास नकार दिला.
यापैकी 19 प्रवाशांनी तर पुन्हा दिल्लीला जाण्याची तयारी दर्शवली. यानंतर मात्र अधिक डबे जोडून त्यांना पुन्हा दिल्लीला पाठविण्यात आलं.