अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत ब्रिटन या देशाने साऱ्या जगाला सावधान केले होते. आता कोरोना व्हायरसच्या आणखी एका प्रकारामुळं ब्रिटनमध्ये पुन्हा हाहाकार माजल्याची माहिती आहे.
आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी बुधवारी सांगितले की दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या नवीन कोविड -19च्या विषाणूचे दोन प्रकार ब्रिटनमध्येही मिळाले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा जसा हा प्रकार आढळला आहे तसाच दक्षिण आफ्रिकेतही वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू सापडले आहेत.
तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की व्हायरसच्या नवीन प्रकारामुळे या देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची आणखी एका लाटेचा सामना करावा लागणार आहे. एका बाजूला जगातील काही देशांनी कोरोना लसीकरण सुरू असताना कोरोनाचे नवे स्ट्रेन सापडत असल्यानं काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकारानं भीतीचं वातावररण असतानाच सावधगिरीचं पाऊल म्हणून भारत आणि युरोपातील अनेक राष्ट्रांनी ब्रिटनमधून येणाऱ्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. तर ब्रिटनमध्येही लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. दरम्यान ‘कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त वेगानं पसरतो.
त्यामुळे सर्व नियमांचं पालन करणाऱ्यांनादेखील नव्या स्ट्रेनचा धोका आहे. मास्क घालणाऱ्या, हात धुणाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे आता जास्त काळजी घ्यावी लागेल, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी सतर्कता गरजेची आहे.
अजूनही अनेक जण मास्क न घालता बाहेर पडतात, लोकांच्या गाठीभेटी घेतात. पण नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागेल. नवा स्ट्रेन सुपरस्प्रेडर असल्यानं तो शरीरात प्रवेश करण्याची शक्यता अतिशय जास्त आहे. त्यामुळे जास्त सावध राहून घराबाहेर पडताना काळजी घेणं अत्यावश्यक आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved