सिंगापूरच्या ड्यूक एनयूएस मेडिकल स्कूलच्या सहकार्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं (IIT) गुवाहाटी यांनी विविध राज्यांमध्ये येत्या
30 दिवसांत कोरोना संसर्गाच्या घटनांचा अंदाज लावण्यासाठी एक नवीन मॉडेल विकसित केले आहे. यानुसार भारतात येत्या 30 दिवसांत 5.5 लाख प्रकरणे समोर येतील.
संशोधकांच्या पथकाने सांगितले की सध्या लॉजिस्टिक पद्धतीने 30 दिवसांत 1.5 लाख आणि घातांकीय (एक्सपोनेंशिअल) पद्धतीने 5.5 लाख प्रकरणे आढळतील अशी शक्यता वर्तवली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती, मात्र या काळातही रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही.
भारतात रुग्णांचा आकडा 67 हजार 152 झाला आहे. तसेच मागील 24 तासात जवळपास 97 लोकांचा मृत्यू झाला. तर मागील २४ तासांत ४ हजार 213 नवीन रुग्ण सापडले आहेत.