जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. सध्या या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क आणि सॅनिटाझरचा वापर केला जातो. मास्क, सॅनिटाझर, पीपीई किट्सची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अशा परिस्थितीत अशा वस्तूंची चीन आणि अन्य देशात होणाऱ्या तस्करीचा प्रकार समोर आला आहे.
बुधवारी दिल्ली सीमाशुल्क विभागानं चीनमध्ये तस्करी केले जात असलेले पीपीई किट, मास्क, कच्चा माल आणि सॅनिटायझर्सचा साठा जप्त केला आहे.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवैधरित्या या वस्तूंची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती.
त्यानुसार सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एअर कार्गोवर छापा टाकला. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
या छाप्यात सीमाशुल्क विभागानं ५.०८ लाख मास्क, ९५० बाटल्यांमध्ये ५७ लीटर सॅनिटायझर आणि नवी दिल्लीत असलेल्या कुरिअर टर्मिनल ९५२ पीपीई किट्सह अन्य शिपमेंट्सही थांबवल्याची माहिती समोर आली आहे.