धक्कादायक खुलासा : दक्षिण आफ्रिकेतून गेल्या १९ दिवसांमध्ये एक हजार प्रवासी मुंबईत !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे, अशातच दक्षिण आफ्रिकेतून गेल्या १९ दिवसांत एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमिक्रॉन वेगाने पसरत आहे. आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. आतापर्यंत जे लोक आले आहेत त्यांची माहिती आपण मिळवली आहे.

जे मुंबईत आहेत त्यांना पालिकेकडून फोन केले जात आहेत”. तसेच परदेशातून आलेल्या गेल्या १० दिवसांतील सर्वांना संपर्क साधून विचारपूस केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था केली जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.

कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत राहावी, जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असं सांगितलं.

ओमिक्रॉन विषाणुचे ५० पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढळणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे.

केंद्र सरकारने १२ देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी ७२ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून येथे उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे.

तसंच सात दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे. परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर

देशांतर्गत विमानसेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न असून पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत करण्यात यावे यावर बैठकीत चर्चा झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe