कोरोना कदाचित कधीच नष्ट होणार नाही.. WHO ने काय दिला इशारा वाचा सविस्तर

Ahmednagarlive24
Published:

‘HIV चा विषाणू आजही अस्तित्वात आहे. तो अजूनही नष्ट होऊ शकलेला नाही. त्याचप्रमाणे करोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही.

जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला. “HIV चा विषाणू अजूनही नष्ट होऊ शकलेला नाही.

पण ज्यांना या विषाणूची लागण झाली त्यांना उत्तम आरोग्य राखून दीर्घायुष्य कसे लाभेल ते मार्ग आपण शोधले. आपल्याला वास्तवाचा स्वीकार केला पाहिजे.

करोना व्हायरसचा आजार कधी संपेल ते आपल्याला ठाऊक नाही असे WHO च्या आरोग्य आपातकालीन कार्यक्रमाचे प्रमुख मायकल जे रेयान म्हणाले. मागच्यावर्षी चीनच्या वुहान शहरातून या करोना व्हायरसचा उगम झाला.

आतापर्यंत जगभरातील ४२ लाख नागरिकांना या व्हायरसची बाधा झाली आहे. जगभरात तीन लाख लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. करोना व्हायरसवर अजून एकही ठोस औषध सापडलेले नाही.

या व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देश लॉकडाउनमध्ये आहेत. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. उपासमारीचा, रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनसह जगातील प्रमुख देशांमध्ये करोनावर लस शोधण्याासठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. पण या आजाराला रोखणारे अजून एकही ठोस औषध सापडलेले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment