कोरोनाविरुद्ध हि लस 90 टक्के यशस्वी; अमेरिकेच्या कंपनीने केला दावा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून जगभर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अनेक देशांमध्ये या व्हारसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. दरम्यान जगभर या व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी व्हॅक्सिन शोधली जात आहे.

यातच सर्वांसाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. जगभरातील कोट्यवधी लोक कोरोना लसीची वाट बघत आहेत. मात्र, आता कदाचित कोरोना लसीची जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कारण अमेरिकेच्या फायजर (pfizers) या कंपनीने कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केला आहे. फायजर लसीची ज्या स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आली, त्यापैकी 90 टक्के स्वयंसेवकांमध्ये सकारात्मक बदल दिसला, असा दावा कंपनीने केला आहे.

फायजरची लस कोरोनावर प्रभावी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे या लसीकडून जितकी अपेक्षा होती त्यापेक्षाही जास्त प्रभावी हे औषध ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. फायजरची लस पूर्णपणे यशस्वी ठरली

तर या महिन्याच्या अखेरपर्यंत लसीला बाजारात विक्रीची अनुमती मिळण्याची शक्यता आहे. ही लस खरच यशस्वी ठरली तर संपूर्ण जगाला फार मोठा दिलासा मिळणार आहे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.’कोरोनावर लवकरच लस येणार आहे. कारण ही लस चाचणीत 90 टक्के प्रभावी ठरली आहे’, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment