अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा २०० च्या पुढे गेला आहे. २ डिसेंबरला देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला.(Omicron)
त्यानंतर अवघ्या २० दिवसांत देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या २०० च्या पुढे गेली आहे. देशात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ओमायक्रॉनमुळे रोज 14 लाख नवे रूग्ण आढळण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यात स्थिती नियंत्रणात राहावी यासाठी आवश्यकतेनुसार तातडीची पावले उचलण्याच्या सूचना आहेत. नाईट कर्फ्यूसह इतरही निर्बंधांच्या सूचना केंद्राने केल्या आहेत.
देशातील 14 राज्यात ओमायक्रॉनचा 14 राज्यांत फैलाव झाला आहे. डेल्टापेक्षा ओमायक्रॉनचा तीनपट अधिक वेग आहे. महाराष्ट्रातही ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येत भर पडत आहे.
देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात काल आणखी 11 रुग्णांची भर पडली. यापैकी 8 रुग्ण मुंबई विमानतळावर तपासणीतील आहेत तर प्रत्येकी 1 रुग्ण पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई इथे आढळलेत.
महाराष्ट्र राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता 65 वर पोहचली असून देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटने आता जम्मू काश्मीरमध्येही शिरकाव केला आहे. भारतातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता 220 वर पोहोचली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम