अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात मार्च २०२२ पासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यासंबंधी केंद्र सरकार विचार करीत आहे.
लवकरच यासंबंधी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे देशात लसीकरण मोहीम अत्यंत तीव्र गतीने करण्यात येत आहे.
यातच ३ जानेवारीपासून १५ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. नॅशनल टेक्निकल अँडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनाइझेशन (एनटीएजीआय) प्रमुख डॉ.एन.के.अरोड़ा यांनी सांगितले की, देशात १५ ते १७ या वयोगटातील सुमारे ३.३१ कोटी मुलांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे.
केवळ १३ दिवसात ४५% मुलांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. जानेवारी अखेरपर्यंत १५ ते १७ या वयोगटातील सुमारे ७.४ कोटी मुलांना लसीचा पहिला दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फेब्रुवारी महिन्यात मुलांना दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत दोन्ही डोस मुलांना दिले जातील. त्यानंतरच १२ ते १४ या वयोगटातील मुलांनी फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चमध्ये कोरोनाची लस देण्यात सूरुवात होऊ शकते, असे सूचक वक्तव्य अरोडा यांनी केले.
१२ ते १७ या वयोगटातील मुले देखील मोठ्या प्रमाणात वयस्कर प्रमाणेच असतात. त्यामुळे सरकार या मुलांना लसीकरणासाठी प्राधान्य देत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम