अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- राहुरी तालुक्यातील उंबरे येथे घराची भिंत अंगावर पडल्याने ११ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
उंबरे येथील वैष्णवी सुनिल ढोकणे( वय-११)ही परिषद प्राथमिक शाळा उंबरे येथे इयता ५ वीत शिक्षण घेत होती.
आज शनिवारी पहाटे साडे चार ते पाच दरम्यान पावसामुळे घराची भिंत पडलेले मयत झाली आहे.
या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांनी तातडीने मदतकार्य करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम