नगर जिल्ह्यातील राहुरी येथील धक्कादायक घटना! घटस्थापनेच्या दिवशी पतीने केला पत्नीचा खून; स्वतःहून पोलीस स्टेशनला झाला हजर

घटस्थापनेच्या दिवशी राहुरी तालुक्यातील येवले आखाडा  येथील घटना पाहिली तर या ठिकाणी पतीने पत्नीचा खून केला व स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर देखील झाला. या प्रकरणात मदत झालेल्या महिलेचे नाव उर्मिला केशव लगे असून त्या 35 वर्षांच्या होत्या.

Published on -

Ahmednagar news: सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर हत्यांचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत असून गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या सगळ्या घडणाऱ्या घटना पाहता गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक राहिला आहे की नाही? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

अगदी जर आपण घटस्थापनेच्या दिवशी राहुरी तालुक्यातील येवले आखाडा  येथील घटना पाहिली तर या ठिकाणी पतीने पत्नीचा खून केला व स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर देखील झाला. या प्रकरणात मदत झालेल्या महिलेचे नाव उर्मिला केशव लगे असून त्या 35 वर्षांच्या होत्या. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे.

 राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथे पतीने केला पत्नीचा खून

राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथे ३५ वर्षीय पत्नीचा पतीनेच खून केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पती स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाल्याचे सांगण्यात येते. ही घटना गुरुवारी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशीच घडली.उर्मीला केशव लगे (वय ३५, रा. येवले आखाडा) असे मयत महिलेचे नाव असून केशव श्रीराम लगे (वय ४०) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे.

राहूरी जवळील येवले आखाडा येथे मळहद्दी म्हणून ओळख असलेल्या परिसरात लगे हे शेतकरी कटंब रहिवासी आहे. पत्नी उर्मिला व पती केशव लगे यांच्यात कायम कौटुंबिक कारणातून वाद होत होते, असे सांगण्यात येते. उर्मिला व केशव यांच्यात बुधवारी सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घरगुती कारणातून वाद झाला.

हा वाद हा आजूबाजूच्या लोकांनी व घरातील नातेवाईकांनी मिटविला होता. मध्यरात्री घरातील सर्वजण झोपी गेलेले होते. मयताची १५ व १७ वर्षाचे दोन मुले असून दोन्ही मुले दुसऱ्या खोलीत झोपले होते. रात्री ११ ते १२ वाजे दरम्यान पुन्हा पत्नी-पतीमध्ये वाद झाले. यावेळी पती केशव याने पत्नी उर्मिलाच्या डोक्यात कुठल्यातरी टणक वस्तूने वेदम मारहाण करत तिचा जागीच खून केला.

त्यानंतर पती केशव हा पहाटे पाच वाजेपर्यंत झोपी गेला व पाच नंतर स्वतः राहुरी पोलिस ठाण्यात जाऊन मी पत्नीचा खून केला असल्याची त्याने कबुली   दिली असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे,

सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र पिंगळे, संदीप परदेशी, अमोल पवार, पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, धर्मराज पाटील, पोलिस कॉन्स्टेबल सुरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, संदीप ठाणगे, संतोष राठोड, नदिम शेख, सचिन ठोंबरे, प्रविण आहिरे, गणेश लिपणे, रविंद्र पवार, गोवर्धन कदम, सतिश कुऱ्हाडे, अंकुश भोसले यांच्यासह ठसे तज्ञ घटनास्थळी पोहोचले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!