अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-टिंडरवर भेटलेल्या एका तरुणासोबत अॅडव्हेंचरस सेक्स करण्याचा तरुणीचा प्रयोग तिच्या अंगाशी आला आहे. या भलत्या प्रयोगाच्या दरम्यान तिचा गळा घोटल्याने मृत्यू झाला.
न्यूझीलंडच्या ऑकलँड शहरात ही घटना घडली असून या प्रकरणी तिच्या टिंडर मित्राला न्यायालयाने सतरा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याबाबत माहिती अशी, ग्रेस मिलाने असे तरुणीचे नाव आहे.
ग्रेस ही मूळची लंडनची असून ती जगाच्या दौऱ्यावर असताना न्यूझीलंडला आली होती. तिथे ती महिनाभर राहणार होती. न्यूझीलंडमध्ये टिंडरद्वारे तिची एका तरुणाशी ओळख झाली.
दरम्यान ग्रेसच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या दोघांनी पहिल्यांदा भेटण्याचा निर्णय घेतला. एकमेकांना भेटल्यानंतर त्यांनी सेक्स करण्याचा निर्णय घेतला मात्र ग्रेस व तिच्या मित्राने त्यातही काही अॅडव्हेंचरस करण्याचे ठरवले.
सेक्स करत असतानाच ग्रेसच्या मित्राने तिचा गळा दाबला. यात ग्रेसचा घुसमटून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या मित्राला अटक केली.
मात्र त्याने ही हत्या नसून एक दुर्घटना असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र न्यायालयाने त्याचे हे दावे फोल ठरवत त्याला 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com