Ahmednagar Breaking : सख्खा मेहुणा व मावसभावांचा आठ वर्ष अत्याचार ! उन्हाळ्यात, दिवाळीत राहायला यायचे आणि.. फाशी देण्याचा विहिरीत ढकलण्याचाही प्रयत्न…

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून समोर आलेल्या एका अत्याचार प्रकरणाने खळबळ उडाली आहे. सख्खा मामे भाऊ व मावस भावाने मिळून एका अल्पवयीन मुलीला गावठी पिस्तूलचा धाक दाखवून गेल्या आठ वर्षा पासून अत्याचार करत असल्याची घटना उघडकीस आली.

ही घटना राहुरी तालुक्यातील एका गावात घडली आहे. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरण, अत्याचार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सख्खा मामेभाऊ ऋषिकेश वय २५ वर्षे व सख्खा मावस भाऊ सतीश अशी आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी : राहुरी तालुक्यातील एका गावात पिडीत मुलीच्या घरी दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत पीडितेचा सख्खा मामेभाऊ ऋषिकेश व सख्खा मावस भाऊ सतीश हे दोघे येत असत. या दोघांनी सन २०१६ ते एप्रिल २०२४ या दरम्यान पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

तसेच या प्रकरणाचा मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केले व तिला वारंवार ब्लॅकमेल केले. तसेच गावठी पिस्टलचा धाक दाखवून तिच्यावर वेळोवेळी विविध ठिकाणी जबरीने अत्याचार केले.

मामेभाऊ ऋषिकेश याने पिडीत मुलीचे अपहरण करून तीला पुणे येथील आळंदी येथे घेऊन जाऊन तिच्याशी बळजबरीने लग्न केले. त्यानंतर तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला फाशी देण्याचा तसेच विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी मामेभाऊ ऋषिकेश व मावस भाऊ सतीश या दोघांवर गून्हा रजि. नं. ५१२/२०२४ भादंवि कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३७६ (ड), ३६६, ३५४, ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४, सह पोस्को अधिनियम कलम ८, ११, १२ प्रमाणे मारहाण, धमकी अपहरण, अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने उजेडात येत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही सातत्याने समोर येत असतात. पोलिसांनी गुन्हेगारी वृत्तींना ठेचून त्यांचा बिमोड करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe