अहमदनगर ब्रेकिंग : प्राध्यापकाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ ! पोलिस ठाण्यात अकस्मात…

Ahmednagarlive24
Published:
Ahmednagar News

श्रीगोंदा शहरातील श्रीछत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. नामदेव बाजीराव गाढवे (वय ४८),यांनी शिवाजीनगर परिसरातील राहत्या घरातील बेडरूममध्ये साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. नामदेव बाजीराव गाढवे (वय ४८), यांनी दि.८ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या

दरम्यान आपल्या श्रीगोंदा काष्टी रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरातील राहत्या घरातील बेडरूममध्ये असलेल्या हुकला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती रंगनाथ जिबे यांनी पोलिसांना कळवताच ‘पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तेथे
कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही.

शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत श्रीगोंदा ‘पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचीनोंद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe