Ahmednagar News : एमआयडीसी, नागापूर येथील पूजा ट्रान्सपोर्ट ऑफीसचे गोडाऊनचे शटर तोडून चोरी करणारे दोघे एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. राहुल महेंद्र मखरे (वय २० वर्षे, रा.नागापूर), सतीश मछिंद्र शिंदे (वय २९ वर्षे रा.तपोवन रोड) असे आरोपींची नावे आहेत.
विशाल राजेंद्र परदेशी यांनी फिर्याद दिली होती की, पितळे कॉलनी, एमआयडीसी नागापूर येथील पूजा ट्रान्सपोर्ट ऑफीसचे गोडाऊनचे शटर उचकटून रोख रक्कम व दोन एलईडी टीव्हीचे सेट चोरी झाले आहेत.
या गुन्ह्याचा तपास करत असताना सपोनि माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा राहुल मखरे, सतीश शिंदे, सागर गोरख मांजरे यांनी केला आहे. त्यांनी एमआयडीसी पोलिसांचे पथक तयार करून सापळा लावून राहुल व सतीश यांना ताब्यात घेतले.
त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख छत्तीस हजार रुपये रोख रक्कम जप्त केली. हे सराईत आरोपी असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. ते जामीनावर बाहेर आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शानाखाली सपोनि माणिक चौधरी, पोसई पाठक, पोहेकॉ नंदकिशोर सांगळे, पोहेकॉ राजू सुद्रिक, पोना बोरुडे आदींच्या पथकाने केली आहे.