Ahmednagar News : भर शहरात गाडीने उडवून मारण्याच्या प्रयत्नांचा थरार ! मित्रांनीच केला ‘गेम’

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime

Ahmednagar News  : नगर शहरातून एक मोठी बातमी आली आहे. एकाला गाडीने उडवून देत मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरात घडली. धक्कादायक बाब म्हणजे मित्रानेच मित्राचा काटा काढण्याचा प्रयत्न केला.याबाबत विशाल शिवाजी घुसळे (रा. गवळीवाडा) यांनी फिर्याद दिली आहे. आदिल सय्यद, राकेश भोसले, तेजस सारवन, गणेश घाडगे, प्रशांत नामदे अशी आरोपींची नावे आहेत.

विशाल घुसळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी भिंगार येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. आमच्या गल्लीमध्ये गवळीवाडा येथे गणेश घाडगे, प्रशांत नामदे हे राहतात. 25 जानेवारी 2024 रोजी रात्री पावणेदोनच्या सुमारास सिद्धार्थ बाबासाहेब शिंदे याचे घरातून जेवण करून निघालो. त्यावेळी माझ्यासोबत गणेश घाडगे हा देखील तेथून निघाला होता.

भिंगार किल्ल्याजवळ येताच मला मंझा कुणीतरी पाठलाग करत आहे असे जाणवले. मी माझी गाडी जोरात पुढे आणली. ताठेमळा येथील संघर्ष चौकात आलो असता बलेनो या गाडीचा धक्का लागला. त्यात मी खाली पडलो व मला मार लागला. त्या गाडीतून प्रशांत नामदे हा खाली उतरायला लागला. परंतु मला पाहताच तो गाडीतून निघून गेला असे म्हटले आहे. दरम्यान आम्ही प्रेमदान हॉटेलचे सिसीटिव्ही फुटेज चेक केले असता, त्यात ही बलेनो गाडी पाठलागावर असल्याचे आढळले.

मला गणेश घाडगे यावर संशय आला कारण प्रशांत नामदे हा त्याचा मित्र आहे. आम्ही सिद्धार्थ बाबासाहेब शिंदे यांच्या घरचे फुटेज तपासले. त्यात गणेश घाडगे हा जेवण करताना मध्येच बाहेर आला व फोनवर बोलत होता की, सगळे कांड झाले ना तूम्ही मला फोन करा… माझ्या डोक्यात असा विचार होता की, कांड करून तूम्ही डायरेक्ट फरार व्हा… पुण्याला जा, पैसे लागले तर ऑनलाईन माघून घ्या, असे बोलताना आढळला.

आणखी काही गोष्टी तपासल्या असता आदिल सय्यद, राकेश भोसले, तेजस सारवन, गणेश घाडगे, प्रशांत नामदे आदींनी मला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने सर्व आव रचला होता असे लक्षात येताच पोलिसांत धाव घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe