Ahmednagar Rape News : विवाहित तरुणीवर अत्याचार करून एका लेकराचा बापही झाला मात्र तरीही…

Published on -

अहमदनगर – महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यातच नगर जिल्ह्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर परिसरातील शेतामध्ये काम करणाऱ्या विवाहित तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

नानासाहेब राउत असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राऊत याने लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार केला. पिडीत तरुणीने एका मुलाला जन्म दिला. मुलाचा बाप म्हणून देखील नाव लावण्यात आले. मात्र तरीही लग्नाला नकार देण्यात आला. तिला राहण्यासाठी भाडोत्री खोली घेऊन देण्यात आली.

बायको म्हणून नांदवले नाही. मात्र लग्नाची मागणी करताच आपल्याला व मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपी नानासाहेब राउत हा विवाहित असून त्याला तीन अपत्ये आहेत असे फिर्यादीत म्हंटले आहे. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नानासाहेब राउत, अनिल देवकर, हेमंत राउत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News