मला चार हजार रुपये दे, असे म्हणून एका तरुणाला शिवीगाळ व मारहाण करत त्याच्या खिशातील १० हजार रुपये काढुन घेतले. राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे नुकतीच हि घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप रावसाहेब नालकर (वय २९), हा तरूण राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे राहत असून त्याचा दुध डेअरीचा व्यवसाय आहे. (दि. २५) नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास संदिप नालकर हा तरूण त्याच्या दुचाकीवरुन डेअरीकडे जात होता.
तेव्हा धानोरे चौकामध्ये त्याच्या ओळखीचा संदेश प्रताप लोंढे हा संदिप नालकर याच्या डेअरी जवळ आला. त्यावेळी त्याने त्याच्या दुचाकीला असलेला लाकडी दांडा हातात घेऊन संदिप नालकर याला म्हणाला कि, मला चार हजार रुपये दे, असे म्हणुन त्याने शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने मारहाण केली.
त्यानंतर त्याने संदिप नालकर याच्या खिशातील दहा हजार रुपये बळजबरीने काढुन घेतले. तसेच माझ्या विषयी तक्रार करशील तर तुझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करील, असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर संदीप रावसाहेब नालकर याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी संदेश प्रताप लोंढे (रा. धानोरे, ता. राहुरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.