वैयक्तिक रागातून फेसबुकवर केली महिलेची बदनामी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  एका तरुणाने एका महिलेचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. या अकाऊंटवरून त्या महिलेची बदनामी या तरुणाने केली. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून तरुणाला अटक केली आहे.

वैयक्तिक रागापोटी त्याने हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. गणेश पांडुरंग गायकवाड (वय-30, रा. सिद्धार्थनगर, नगर) असे आरोपीचे नाव आहे.

गायकवाड याने फिर्यादी महिलेचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. त्याद्वारे फिर्यादीच्या भावाच्या मित्राला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. फिर्यादी असल्याचे भासवत त्या मित्रासोबत चॅटिंग केली.

फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणीचे सेल्फी फोटो मित्राला पाठवून फिर्यादी महिलेची बदनामी केली. फिर्यादीच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तपासाअंती त्याने वैयक्तिक रागापोटी गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दखल केला असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment