Ahmednagar News : दोन आरोपींनी जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या आवारात धिंगाणा घातला. हे आरोपी लोणी पोलिसांच्या ताब्यातील आहे. त्यांना जिल्हा रूग्णालयात आणले होते. त्यांना रूग्णालयातच काही दिवस उपचाराच्या नावाखाली थांबायचे होते.
अक्षय दत्तात्रय बनसोड व शाहरूख सत्तार खान अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान त्यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अशोक शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
खून व दरोड्याच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टरने तपासणी केल्यानंतर त्यांना परत नेण्यास सांगण्यात आले. मात्र या आरोपींना जेलमध्ये पुन्हा न जाता रूग्णालयातच काही दिवस उपचाराच्या नावाखाली थांबायचे होते.
त्यामुळे त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. एकाने भिंतीवर डोके आपटून स्वतःला जखमी करून घेण्याचाही प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.