Ahmednagar Crime : नवीन रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपए आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीला सासरच्या लोकांकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात सासरच्या आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहितीअ शी, की सफिया सोहेल शेख (वय २९ वर्षे, रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द, जि. पुणे. हल्ली रा. राहुरी) या विवाहित तरुणीने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की सफिया शेख हिचा विवाह २४ डिसेंबर २०२२ रोजी सोयल नाजर शेख (रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द, जि. पुणे) याच्या बरोबर झाला होता. सासरच्या लोकांनी सफिया हिला सुरुवातीला दोन ते तिन महीने चांगले नादविले.
त्यानंतर काही दिवसांनी सफिया हिचा पती सोहेल याची नोकरी गेल्याने सफिया हिने नोकरी करुन पैसा कमवावा, या कारणावरून सासरचे लोक तीचा शारीरीक व मानसीक छळ करु लागले.त्यानंतर नवीन रिक्षा घेण्यासाठी सफिया हिने तीच्या माहेरहून दोन लाख रूपए आणावेत,
यासाठी तीला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून छळ करु लागले. सफिया हिला तीच्या पतीने व इतर लोकांनी लाथा बुक्क्याने मारहान करुन शिवीगाळ दमदाटी केली. सासरच्या त्रासाला कंटाळून सफिया सोहेल शेख हिने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्या फिर्यादीवरून आरोपी सोहेल नाजर शेख, नाजर आब्दुल गणी शेख, शहीनाज नाजर शेख, नुरजहाँ नाजर शेख (रा. कोंढवा खुर्द, जि. पुणे), तसेच रहीसा आल्लाउद्दीन शेख, वशिम सय्यद, दिलशाद अमिर हमजा सय्यद, सिरीन वशिम सय्यद (रा. येरवडा, पुणे) या आठ जणांवर गुन्हा रजि. नं. २८७/२०२४ नुसार भा.दं.वि. कलम ४९७ (अ), ३२३, ३४, ५०४, ५०६ प्रमाणे शारीरीक व मानसीक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.