आजार बरा करतो या नावाखाली आई व दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या बाबत सोनई पोलिस ठाण्यात फादरसह दोघांवर ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. उत्तम बळवंत वैरागर, संजय केरु वैरागर, व सुनील गुलाब गंगावणे हा मुख्य (धर्मगुरु) राहणार टीव्ही सेंटर अहमदनगर या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत दिलेल्या फिर्यादीत महिलेने म्हटले आहे की, डिसेंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान नेवासा तालुक्यातील सोनई येथील बेल्हेकरवाडी परिसरात असलेल्या एका चर्चमध्ये फिर्यादी महिलेची मुलगी व भाची अनुक्रमे दहा व अकरा वर्षीय मुलींच्या अंगामध्ये सैतान शिरले असल्याने त्याला काढण्यासाठी दोन्ही मुलींना आरोपी संजय वैरागर व सुनिल गंगावणे याने आजार बरा करतो म्हणून डिसेंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान चर्चमध्ये बोलावून घेतले. अल्पवयीन मुलींच्या आईच्या पाठीवरुन हात फिरवून तिस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

आरोपी उत्तम वैरागर याने फिर्यादीची मुलगी व भाची यांच्या अंगात सैतान शिरला आहे असे म्हणुन त्यांना चर्चमध्ये बोलून घेत लैंगिक छळ व अत्याचार केला असल्याचे दिलेल्या फिर्यादीमध्ये महिलेने म्हटले आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात ३५४, ३७६, बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्मगुरूंनी असे घाणेरडे कृत्य केल्याने अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सोनई पोलीस ठाण्याच्या परिसरात जमावाने गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ सोनई परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळाली होती. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. तपासाअंती आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.