मुलीशी बोलल्याच्या रागातून तरुणासह त्याच्या मित्रांना मारहाण! मारहाण झालेल्या पैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू; शेवगाव तालुक्यातील घटना

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेल्या ठाकूर निमगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली असून या ठिकाणी मुलीशी बोलल्याच्या रागावरून एका तरुणासह त्याच्या दोन मित्रांवर मुलीच्या नातेवाईकांनी प्राणघातक हल्ला केला व या हल्ल्यामध्ये तिघे तरुण गंभीर जखमी झाले.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेल्या ठाकूर निमगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली असून या ठिकाणी मुलीशी बोलल्याच्या रागावरून एका तरुणासह त्याच्या दोन मित्रांवर मुलीच्या नातेवाईकांनी प्राणघातक हल्ला केला व या हल्ल्यामध्ये तिघे तरुण गंभीर जखमी झाले.

जखमी अवस्थेत या तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व सोमवारी या तिघांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बंटी राजेंद्र चव्हाण उर्फ प्रमोद राहणार ठाकूर निमगाव ता. शेवगाव असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे.

 मुलीशी बोलल्याच्या रागावरून तिघांना मारहाण

मुलीशी बोलणाऱ्या युवकासह त्याच्या दोन मित्रांना मुलीच्या नातेवाइकांनी दोरीने बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तिघांपैकी एका तरुणाचा सोमवारी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रमोद उर्फ बंटी राजेंद्र चव्हाण (रा. ठाकूर निमगाव, ता. शेवगाव) असे मृताचे नाव आहे.

या घटनेप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात मयूर कैलास रोठे याने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी व त्याचे मित्र प्रमोद राजेंद्र चव्हाण, सार्थक अशोक काकडे हे तिघे जण ९ ऑक्टोबर रोजी शेवगाव बसस्थानक येथे गेले होते. यावेळी प्रमोद चव्हाण हा एसटी बसमध्ये बसलेल्या त्याच्या मामाच्या मुलीशी बोलत होता.

त्यावेळी बारक्या पठाण याने मोबाइलमध्ये शूटिंग घेऊन ते भारत आसाराम कातकडे यांना पाठविले. दरम्यान, तिघे मित्र निमगाव येथे गावी परतले होते. हे तिघे गावातील मराठी शाळेत बसलेले होते.

याचवेळी भारत आसाराम कातकडे, अशोक ताराचंद निजवे, बारक्या पठाण हे तिथे आले. यावेळी भारत याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने प्रमोद चव्हाण यास मारहाण करण्यास सुरुवात केली.

प्रमोद यास सोडवण्यासाठी मयूर रोठे व सार्थक काकडे गेले असता, अशोक निजवे, बारक्या पठाण यांनी तिघांनाही लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच त्यांना भारत कातकडे याच्या घराकडे नेऊन त्यांना दोरीने बांधून ठेवले. यावेळी भारत  कातकडे, शारदा भारत कातकडे, अशोक निजवे, बारक्या पठाण यांनी लोखंडी रॉडने पुन्हा या तिघांना मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!