अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील खरखंडी कासार बाजारतळावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.
एकूण नऊ जुगाऱ्यांविरुद्ध पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनास्थळावरून पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल दुचाकी, जुगाराची साधने असा एक लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे एक पथक पाथर्डी तालुक्यात पसार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहितीनुसार पथकाने छापा टाकून एक लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जुगाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे
संजय बापू शेकडे, बाबासाहेब जनार्धन कराड, संतोष नवनाथ बांगर, देविदास वामन कराड, अंबादास पंडित बटूळे, अंबादास वामन कराड, मारूती हरिभाऊ बटुळे (सर्व रा. भारजवाडी ता. पाथर्डी),
हनुमंत अशोक गोल्हार (रा. जवळवाडी ता. पाथर्डी) व राजेंद्र महादेव दराडे (रा. मालेवाडी ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
दरम्यान सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ, राहल सोळुके, शिवाजी ढाकणे, जालिंदर माने, आकाश काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम