Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ हॉटेलवर छापा, सुरु होते हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठे वृत्त हाती आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पिंपरी निर्मळ येथे एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला आहे.पिंपरी निर्मळ शिवारात नगर मनमाड रोडवर हॉटेल साई श्रद्धा येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरु होते. पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करत छापा टाकत परप्रांतीय मुलींची सुटका केली आहे.

१४ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी पिंपरी निर्मळ शिवारात नगर मनमाड रोडवर हॉटेल साई श्रद्धा येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याबाबत खात्रीशिर बातमी पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन एका पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे.

या छाप्यात दोन आरोपीना ताब्यात घेण्यात आले. महिला पोलीस अमलदार संगीता नागरे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, वैभव कलूबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी शिरीष वमने, पो. नि. कैलास वाघ आदींनी केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात याआधीही अनेक ठिकाणी पोलिसांनी छापे टाकत अशा पद्धतीच्या वेश्या व्यवसायावर कारवाई केलेली आहे. आता या कारवाई मध्ये काही आरोपी पकडले असून परप्रांतीय मुलींची सुटका देखील केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe