Ahemednagar news: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या अळसुंदे येथे 6 ऑगस्ट 2023 रोजी गोकुळ जयराम क्षीरसागर याने स्वतःच्या दोन लहान मुलांना कटिंग करण्याच्या बहाण्याने घरून नेले आणि विहिरीत फेकून त्यांचा खून केला होता. हा सगळा प्रकार पती पत्नी मधील घरगुती वादातून घडला असल्याचे समोर आले होते.
याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये भांदवी कलम 302 प्रमाणे सात ऑगस्ट 2023 ला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता व आता या प्रकरणाचा निकाल श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयाने दिला असून या पित्यास दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

पोटच्या मुलांचा खून करणाऱ्या पित्यास कोर्टाने सुनवली जन्मठेप व पाच हजार दंडाची शिक्षा
स्वतःच्या दोन लहान मुलांना विहिरीमध्ये फेकून त्यांचा खून करणाऱ्या गोकुळ जयराम क्षीरसागर (अळसुंदे, ता. कर्जत) या पित्यास श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अळसुंदे (ता. कर्जत) येथे राहत असणारे गोकुळ जयराम क्षीरसागर व शीतल गोकुळ क्षीरसागर या पती- पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद होत असे.
त्यांना ऋतुजा (वय ८) व वेदांत (वय ४), असे एक मुलगा व मुलगी होते. ६ ऑगस्ट २०२३ रोजी या दोन मुलांना कटिंग करून आणतो, असे म्हणून वडील गोकुळ हा घेऊन गेला होता. घराजवळील शेतामध्ये पाणी असलेल्या विहिरीमध्ये दोन्ही मुलांना फेकून देत निर्दयीपणे खून केला. याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२ प्रमाणे ७ ऑगस्ट २०२३ ला गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयात हा खटला चालविण्यात आला. कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे व तत्कालिन प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक अरुण पाटील, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, सहायक पोलिस निरीक्षक अनंत सालगुडे यांनी आरोपीला तत्काळ ताब्यात घेऊन अटक केली.
सखोल तपास करून मुदतीत न्यायालयात दोषारोपत्र, आवश्यक सर्व कागदपत्रे, पुरावे न्यायालयात सादर केले. श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयात खटला चालविण्यात आला. सरकारी पक्षाकडून अॅड. केसकर यांनी काम पाहिले.
त्यांना पोलिस अंमलदार आशा खामकर यांनी सहकार्य केले. याप्रकरणी दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद होऊन अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी या घटनेतील आरोपी गोकुळ जयराम क्षीरसागर यास जन्मठेपेची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला