अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आली असल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील कासारवाडी परिसरात घडली आहे .
प्रदीप पोपट कोल्हे असे या मयत युवकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी प्रदीप कोल्हे हा दोन दिवसांपूर्वी दवाखान्याचे कारण सांगून घराबाहेर पडला होता.
तो घरी आला नाही म्हणून त्याच्या नातेवाईकांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची खबर दिली. सोमवारी रात्री संगमनेर शहरालगतच्या कासारवाडी शिवारातील एका विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला.
बाबासाहेब पांडे (रा. घुलेवाडी) यांनी शहर पोलिसांना याबाबतची खबर दिली. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी या युवकाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
पोलिसांनी पंचनामा करून त्याचा मृतदेह कॉटेज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर कोल्हेवाडी येथे प्रदीप कोल्हे याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शहर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम