Ahmednagar News : ‘या’ माजी सरपंचाने शेतात महिलेला एकटे पहिले अन डाव साधला !

Published on -

अहमदनगर जिल्ह्यातून महिलांबाबत अनेक गुन्हे सातत्याने उघडकीस येत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे अशी स्थिती निर्माण तर झाली नाही ना असे चित्र काही घटनांवरून तयार झाले आहे.

बँकेच्या माजी संचालकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच आता माजी सरपंचाने शेतातील गवत काढणाऱ्या महिलेसोबत दुष्कृत्य केल्याचे समोर आले आहे. हा आरोपी राहुरी तालुक्यातील एका गावचा माजी सरपंच आहे.

राहुरी तालुक्यातील एका गावातील एक महिला शेतामध्ये गवत घेत होती. त्या महिलेला मला तू खूप आवडतेस असे म्हणत तिला खाली पाडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच तू जर कोणाला काही सांगितले तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी या माजी सरपंचांनी दिली. या घटनेने महिला घाबरून गेली होती.

या महिलेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. पतीने याबाबत माजी सरपंचाला तू माझ्या पत्नी सोबत असे का केले विचारण्यासाठी गेला असता माजी सरपंचाने त्याला देखील बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील २५०० रुपये काढून घेतले. त्यांना देखील मारहाण केली त्याचबरोबर शिवीगाळ देखील या व्यक्तीने केले आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.

या संदर्भात सदर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत या माजी सरपंचाविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. या माजी सरपंच विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या माजी सरपंचाला तात्काळ अटक करा अशी मागणी नागरिक करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News