अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- एस. टी. बसमध्ये सहप्रवासी म्हणून शेजारी बसलेल्या अनोळखी तीन महिलांनी तरुणीच्या बॅगमध्ये असलेला सव्वा दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याच्या दागीन्यांचा डब्बा चोरुन नेल्याची घटना राहुरी ते नगर या प्रवासादरम्यान घडली.
याबाबत माहिती अशी की, दीप्ति भास्कर लांडे (रा.गुरु रेसिडेन्सी, पद्मानगर कॉर्नर, पाईपलाईन रोड) ही तरुणी राहुरी येथून नगरकडे येण्यासाठी शिर्डी ते दौंड जाणार्या एस.टी. बसमध्ये बसली.
तिच्या शेजारी तीन अनोळखी महिला सहप्रवासी म्हणून बसल्या होत्या. नगरच्या बसस्थानकावर उतरल्यानंतर दीप्ति लांडे यांच्या निदर्शनास आले की त्यांच्या बॅगमध्ये सोन्याचे दागीने असलेला डबा चोरीला गेला आहे.
त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम