Ahmednagar Crime : आजी व नातवाच्या खून प्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : आजी व नातवाच्या खून प्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नेगपालसिंग पोटीयासिंग चितोडिया व कमलसिंग उर्फ तोतासिंग उर्फ राकेश नेगपालसिंग चितोडिया (मूळचे केशरनगर, भुसावळ, जि. जळगाव) असे शिक्षा ठोठावल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

जिल्हा न्यायाधीश आर. एन. नाईकवाडे यांनी या खटल्याचा निकाल जाहीर केला. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. सुनिल डी. ढगे यांनी काम पाहिले.

या खटल्याची थोडक्यात हकिगत अशी की, कमलाबाई कापडियासिंग चितोडिया व त्यांचा नातू सुनिलसिंग टिकूलसिंग बुटासिंग चितोडिया यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. ही घटना शेवगाव शहरातील शेवगाव ते पाथर्डी जाणाऱ्या रोडलगत इदगाह मैदानाजवळ घडली होती.

आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात १५ जानेवारी २०२१ रोजी भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

सपोनि. सुजित पंडित ठाकरे यांनी फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी वरील दोघा आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध तपासी अधिकारी प्रभाकर पाटील यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये साक्षीदार, पंच, डॉक्टर, सपोनि. सुजित ठाकरे, तपासी अधिकारी प्रभाकर पाटील, आदींच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षातर्फे अॅड. अनिल ढगे यांचा युक्तिवाद महत्वाचा ठरला.

सरकारी अभियोक्ता अॅड. मंगेश दिवाणे यांनी तपासी अधिकाऱ्यांच्या साक्ष नोंदवल्या. या खटल्यात पैरवी अधिकारी पोहेकॉ. ए.बी. चव्हाण व पोहेकॉ. ए.एन. बेळगे यांचे सहकार्य लाभले. कोटनि दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe