Ahmednagar Crime : तालुक्यातील बेलापूरातील खटकाळी येथील शेख यांच्या घरावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके, कुन्हाड, धारदार हत्याराने नुकताच हल्ला चढविला.
यत घराच्या काचा दरवाजे तोडून घरासमोर लावलेल्या दुचाकीही पेटवुन दिल्याची घटना काल मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवुन दोन जणाना ताब्यात घेतले आहे.
बेलापूरातील पाहुणेनगर खटकाळी गावठाण येथे रुखसाना इक्बाल शेख या राहात असून त्यांनी बचत गटामार्फत कर्ज घेतले होते. त्यातील काही महिलांनी कर्ज वेळेवर भरले नाही म्हणून रुखसाना यांनी कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्याबाबत त्याच परिसरात राहणारे चव्हाण यांना सांगितले.
त्याचा राग आल्यामुळे या दोन कुटुंबात वाद झाले होते. त्यावेळी मोठा जमाव बेलापूर पोलीस स्टेशनला जमा झाला होता. त्यावेळी तक्रार देण्यास कुणीही पुढे आले नाही, याच गोष्टीचा राग मनात धरून राजेंद्र उर्फ पप्पू भिमा चव्हाण याने आपल्या चार ते पाच साथीदारा समवेत लाकडी दांडके, धारदार हत्यारे, कुऱ्हाड घेवुन पहाटे तीनच्या सुमारास रुकसाना शेख यांच्या घरावर हल्ला चढविला.
घरातील खिडकीच्या काचा फोडल्या. घराच्या पाठीमागील गेटचा दरवाजा तोडून मागील खिडकीच्या काचाही फोडल्या. बाथरुमचाही दरवाजा तोडण्यात आला. शिलाई मशिन फोडण्याचा प्रयत्न केला.
तसेच घरासमोर दोन मोटार सायकली लावालेल्या होत्या. त्यावर पेट्रोल टाकुन त्या पेटविल्या. त्यात ज्यूपिटर गाडी जळून खाक झाली. त्या शेजारी उभी असलेल्या स्प्लेंडर मोटार सायकलची मोडतोड करुन ती ही पेटविली होती. पोलिसांनी तातडीने ती आग विझवली व दोन्ही वाहने पोलीस स्टेशनला आणली.
हा प्रकार चालु असतानाच रुक्साना शेख यांच्यासमोर राहणारे नातेवाईक सुलताना युसुफ पठाण या मदतीकरीता धावल्या असता त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यामुळे त्या जखमी झाल्या तेथेच राहणारे फिरोज पठाण याने बेलापूर पोलीस स्टेशनला फोन केला.
अगदी काही वेळेतच बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुधीर हाफसे, पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, हरिष पानसंबळ, भारत तमनर, नंदु लोखंडे, संपत बडे हे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पहाताच पप्पू चव्हाण शहारुख शेख व त्यांच्या साथीदारांनी पळ काढला.
पोलिसांनी तातडीने शहारुख सांडू शेख व पप्पू उर्फ राजेंद्र भिमा चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले. सुलताना युसुफ पठाण यांच्या फिर्यादीवरुन शहारुख सांडू शेख पप्पू उर्फ राजेंद्र भिमा चव्हाण व इतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जिवन बोरसे हे करीत आहेत.